आदिवासी भागालास्ट्रॉबेरी ने दिला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 03:01 PM2020-12-27T15:01:12+5:302020-12-27T15:03:07+5:30
दिंडोरी तालुका : वणी-सापुतरा रस्त्यावर थाटली दुकाने लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही भागातील पिके, फळे, रानभाज्या इ.संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे आकर्षण बनल्या आहे. त्यामध्ये रस्त्याच्या कडेला छोट्या दुकानातील स्ट्रॉबेरी आता येणाऱ्या प्रत्येकांचे लक्ष वेधून घेत असुन खरेदीचा मोह सुटत आहे.
दिंडोरी तालुका : वणी-सापुतरा रस्त्यावर थाटली दुकाने लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही भागातील पिके, फळे, रानभाज्या इ.संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे आकर्षण बनल्या आहे. त्यामध्ये रस्त्याच्या कडेला छोट्या दुकानातील स्ट्रॉबेरी आता येणाऱ्या प्रत्येकांचे लक्ष वेधून घेत असुन खरेदीचा मोह सुटत आहे.
तालुक्यातील काही भागात थंडीच्या हंगामात स्ट्रॉबेरीचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने या पिकांला चांगला बहर येत आहे.
लाल, गुलाबी रंगाची, गोड आंबट चवीची छोट्या कागदांच्या खोक्यामधील स्ट्रॉबेरी पाहिल्यावर प्रत्येकांच्या तोंडाला पाणी सुटते. थंडीच्या दिवसात आरोग्यदायी असणारी स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असते. सध्या थंडीचा हंगाम असल्याने या पिकांला चांगला बहर आला असुन आदिवासी भागातील शेतकरी बांधवांना मोठा आधार मिळत आहे.
काही शेतकरी मोठ्या घाऊक व्यापारी वर्गाला माल देतात .तर काही मुंबई, गुजरात व महाराष्ट्रातील विविध भागात हा माल विक्रीसाठी पाठवितात. परंतु काहींनी तात्काळ नगदी पैसा उपलब्ध व्हावा यासाठी वणी, सापुतरा, विविध धार्मिक स्थळे या ठिकाणी छोटी दुकाने थाटुन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी ठेवतात. या विक्रीतून परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांना चांगल्यापैकी अर्थार्जन होऊ लागले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ, कळवण, सुरगाणा इ. घाटमाथ्यावरील लाल मातीत पिकणारी लालभडक आंबट गोड स्ट्रॉबेरी फळे वणी, सापुतारा, सप्तशृंगी गड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दिसत असल्यामुळे प्रत्येक प्रवासी, भाविक, पर्यटक यांचे मन आकर्षण करून खरेदी करतानांचे चित्र सध्या दिसत आहे.
स्ट्रॉबेरी हे पिक साधारणपणे कळवण, सुरगाणा, पेठ भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कारण या भागातील जमिनीतील माती ही लाल स्वरूपांची असल्याने ती या पिकांच्या पोषकांला महत्त्वाची मानली जाते.व पिकंही जोमाने येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग आपल्या शेतात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी पिके घेऊ लागला आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी पिकांचे क्षेत्र वाढु लागले आहे. या पिकांकडे आता या भागातील शेतकरी वर्ग नगदी भांडवल मिळुन देणारे पिक म्हणून पाहु लागला आहे.
त्यामुळे हे पिके आता तालुक्यातील आदिवासी शेतकरी वर्गाँला आधार देऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.
हिवाळ्यात उपयुक्त स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी हे फळ थंडीत येणारे फळ म्हणून ओळखले जाते. साधारण पणे डिंसेबर, जानेवारीमध्ये या फळांला जास्त बहर येत असतो. हे आरोग्यदायी असल्याने ते खाल्ले तर त्वचा रोग दुर होतो. व शरीरात रक्त वाढण्यासाठी मदत होते. असे हे फळ पिकविणारे शेतकरी सांगतात. (२७ लखमापूर)