भरपावसात आदिवासी बांधवांची शहरात रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 01:13 AM2019-08-10T01:13:25+5:302019-08-10T01:13:57+5:30
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही आदिवासींवर अन्याय, अत्याचार सुरू आहेत. यासाठी अन्यायाविरोधात आदिवासींनी संघटित होऊन संघर्ष करा. जागतिक आदिवासी दिनी संघटित होण्याचा संकल्प करून हक्कासाठी लढा, असे प्रतिपादन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केले.
नाशिक : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही आदिवासींवर अन्याय, अत्याचार सुरू आहेत. यासाठी अन्यायाविरोधात आदिवासींनी संघटित होऊन संघर्ष करा. जागतिक आदिवासी दिनी संघटित होण्याचा संकल्प करून हक्कासाठी लढा, असे प्रतिपादन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केले.
जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने ईदगाह मैदानावर शुक्र वारी (दि.९) विशेष सोहळ्याचे उद््घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते झाले. कार्यक्र मास केंद्रीयमंत्री फग्गनसिंह कुलस्ते, परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरराव बोहात, महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती सरिता सोनवणे, आयोजक लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते. पिचड म्हणाले की, ९ आॅगस्ट हा क्र ांतिदिन आहे. यादिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’चा नारा दिला.
रॅलीत युवकांचा उत्साह
जागतिक आदिवासी दिनानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यातर्फे भर पावसातदेखील रॅली काढण्यात आली होती. निमाणी बसस्थानक येथून सुरू झालेल्या या रॅलीत आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक वेषामध्ये नृत्य कला सादर केल्या. या रॅलीतील युवकांचा उत्साह बघून त्यात केंद्रीयमंत्री कुलस्तेदेखील सहभागी झाले. त्यांनीही युवकांसोबत नृत्यात सहभाग घेतला. शहरात निघालेल्या या रॅलीमुळे वाहतूक व्यवस्थेवर देखील अतिरिक्त ताण पडला.