आदिवासी बांधव शासन योजनांपासून दूर राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:37+5:302021-06-24T04:11:37+5:30
घोटी : महाराष्ट्र शासनाची राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली घोटी-मुंढेगाव येथील शासकीय ...
घोटी : महाराष्ट्र शासनाची राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली घोटी-मुंढेगाव येथील शासकीय माध्यमिक शाळेत इगतपुरी तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीत पंडित यांनी शासनाच्या योजना, खावटी, रेशनिंग व्यवस्था, पोषण आहार, कुपोषण स्थिती आदींचा आढावा घेऊन आदिवासी बांधव शासनाच्या योजना व सोयी-सुविधांपासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याचा सूचना केल्या.
या आढावा बैठकीस आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा, सहाय्य जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्यासह महसूल,आरोग्य,शिक्षण,वन,पुरवठा, आदी विभागांचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्रमजीवी संघटनेचे जनरल सेक्रेटरी विजय जाधव,जिल्हाध्यक्ष रामराव लोंढे,उपाध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, तालुका अध्यक्ष सीताराम गावंडे, नीता गावंडे,काळू निरगुडे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (२३ घोटी २)
-----------------------
पोषण आहाराबाबतही घेतला आढावा
आदिवासी भागात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत प्रशासनाने काय पूर्वतयारी केली, याबाबतची माहिती घेऊन आदिवासी भागात दर्जेदार आरोग्य सुविधा व शैक्षणिक सुविधा देण्याचे आदेश दिले, तसेच ज्यांना रेशनकार्ड नाहीत अशा गरीब कुटुंबाला तहसीलदार यांनी धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केली. कुपोषण स्थितीचा आढावा घेऊन एकही बालक दगावणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना केल्या. पोषण आहार अंगणवाडीमध्ये असणाऱ्या बालकांना मिळतो की नाही, मिळत असेल तर किती मिळतो याबाबत आढावा घेण्यात आला.
===Photopath===
230621\23nsk_21_23062021_13.jpg
===Caption===
२३ घोटी २