सापगावी होणार आदिवासी सांस्कृतिक भवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:23 PM2018-11-15T13:23:47+5:302018-11-15T13:24:11+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव येथे राज्य शासनाने आदिवासी सांस्कृतिक भवनसाठी सुमारे एक कोटी रूपये खर्चाच्या कामास मंजुरी दिल्याची माहिती ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव येथे राज्य शासनाने आदिवासी सांस्कृतिक भवनसाठी सुमारे एक कोटी रूपये खर्चाच्या कामास मंजुरी दिल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली. तालुक्याच्या ग्रामीण भागात आदिवासी बांधवांसाठी एखादे कलादालन असावे अशी मागणी निर्मलाताई गावित यांनी शासनाकडे केली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रथमच एक कोटी रु पयांचे आदिवासी सांस्कृतिक भवन होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातुन सांस्कृतिक भवन किंवा सांस्कृतिक कला दालन हे आपली कला दाखविण्याचे तसेच नवोदित कवी, लेखक, पारंपारिक लोकनृत्य विविध वाद्य कला वाढविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ होणार आहे. आदिवासी विकास मंत्रालया कडून मंजुरी मिळाल्याने सांस्कृतिक भवनचा मार्ग मोकळा झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथे बहुउद्देशिय
सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, यासाठी गेली काही वर्षे राज्य सरकारकडे गावित यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार, या भवनच्या कामाचा आराखडा तयार करु न तसा प्रस्ताव देखील सादर केला होता. आता सरकारने निधी मंजूर केल्याने हे काम मार्गी लागले आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरु वात होईल. आता फक्त निविदा एजन्सी वगैरेंची औपचारिकता पुर्ण होणे बाकी आहे. तालुक्यातील सांस्कृतिक भवनच्या रूपाने लवकरच ही गरज आता पुर्ण होत आहे.