दलपतपूर येथे आदिवासी सांस्कृतिक भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:19 AM2021-08-18T04:19:47+5:302021-08-18T04:19:47+5:30

हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथे आदिवासी योजनेतून मंजूर झालेल्या सुमारे ३० लाख रुपये निधीतून होणाऱ्या सांस्कृतिक भवनाचे ...

Tribal Cultural Building at Dalpatpur | दलपतपूर येथे आदिवासी सांस्कृतिक भवन

दलपतपूर येथे आदिवासी सांस्कृतिक भवन

Next

हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथे आदिवासी योजनेतून मंजूर झालेल्या सुमारे ३० लाख रुपये निधीतून होणाऱ्या सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन रविवारी (दि.१५) करण्यात आले.

आदिवासी समाजातील लोककला, सामूहिक लग्न, परंपरागत सण, उत्सव आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्याच्या दृष्टीने आदिवासी भागामध्ये जागा उपलब्ध नसते त्यामुळे त्यांच्यातील असलेले कौशल्य व इतर गुणांना वाव नसतो आणि त्यांच्यात असलेले कौशल्य आणि सांस्कृतिक बुजरेपणा घालविणे यासाठी आदिवासी भागामध्ये सांस्कृतिक भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दलपतपूर येथे भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन साकारण्यात येत असल्यामुळे आदिवासींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, यासाठी गेली काही वर्षे राज्य सरकारकडे माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य रवींद्र भोये यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

यावेळी मुख्तार सय्यद, योगेश देवरगावकर, गोकुळ बत्तासे, चिन्मय साखरे, श्याम सय्यद, चेतन साखरे, भरत खोटरे, महेश लांघे, चेतन भोये व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Tribal Cultural Building at Dalpatpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.