आदिवासी शेतकऱ्यांची संक्र ात झाली गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:05 PM2019-01-16T13:05:32+5:302019-01-16T13:06:07+5:30
पेठ -तालुक्यातील जवळपास चार एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर शेतक-यांनी विक्री केलेल्या धान्याचा मोबदला त्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याने ऐन संक्र ातीचा सण आदिवासी शेतक-यांसाठी खºया अर्थाने गोड झाला आहे.
पेठ -तालुक्यातील जवळपास चार एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर शेतक-यांनी विक्री केलेल्या धान्याचा मोबदला त्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याने ऐन संक्र ातीचा सण आदिवासी शेतक-यांसाठी खºया अर्थाने गोड झाला आहे. आदिवासी शेतकºयांना त्यांच्या विक्री केलेल्या धान्याची पावती मिळाली मात्र आॅनलाईनच्या नावाखाली प्रशासनाच्या गलथानपणामुळे दोन महिने उलटूनही शेतक-यांना त्यांची रक्तम मिळाली नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांच्या व्यथा ‘लोकमत’मधून प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. संचालक धनराज महाले यांनीही आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाºयांशी चर्चा करून शेतकºयांना रक्कम देण्याची मागणी केली. यावर आदिवासी विकास महामंडळाने तात्काळ कार्यवाही करत शिखर बँक, महाराष्ट्र बँकेच्या अधिकाºयांशी चर्चा करून तांत्रिक अडचणी दुर केल्या. मकर संक्रांतीच्या पुर्वसंध्येला शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने खºया अर्थाने आदिवासी शेतक-यांचा संक्र ात या उत्सवात गोडवा निर्माण झाला.