पेठ तालुक्यात आदिवासी गौरव दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 06:02 PM2018-08-09T18:02:49+5:302018-08-09T18:03:18+5:30
जागतिक आदिवासी गौरव दिन पेठ शहर व तालुक्यात विविध उपक्रमांनी अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी माळेगाव येथील शहीद स्थानावर आदिवासी क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले.
आमदार नरहरी झिरवाळ, जि. प. सदस्य भास्कर गावीत उपस्थित होते. पेठ येथील हुतात्मा स्मारक येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शहरातून ढोल, ताशासह पारंपरिक आदिवासी नृत्याच्या तालावर रॅली काढण्यात आली. तालुक्यातील विविध संघटना, सामाजिक संस्था, आदिवासी शिक्षक संघटना यांनी आयोजन केले. सकाळी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तालुक्यातील शाळा महाविद्यालयात आदिवासी दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा करून शोभायात्रेत सहभाग नोंदवला. आदिवासी आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.
इन्फो...
बामणे, चौधरी यांना पारितोषिक
पंचायत समिती कार्यालय आवारात झालेल्या कार्यक्रमात आदिवासी क्रिडापटू ताई बामणे व वर्षा चौधरी यांचा प्रत्येकी २१ हजार रु पयाचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रशिक्षक भगवान हिरकूड यांचाही सन्मान करण्यात आला. खो खो खेळाडू निशा वैजल, ऋतूूजा सहारे आदींचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
झेंडे, टोप्या ठरल्या आकर्षण
जागतिक आदिवासी दिनाच्या शोभायात्रेत मी आदिवासी मजकूर असलेल्या टोप्या व हातात झेंडे घेतल्याने परिसरात वातावरण तयार झाले होते. संततधार पावसातही आदिवासी बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता.