आदिवासी मुलींना सक्तीने नृत्य करण्यास भाग पाडले! घटनेची चौकशी होणार
By संजय पाठक | Published: June 22, 2023 12:49 PM2023-06-22T12:49:26+5:302023-06-22T12:50:26+5:30
पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती, वादग्रस्त वसतिगृह केले सील
संजय पाठक, नाशिक- त्रंबकेश्वर जवळ असलेल्या पहिने परिसरातील एका वसतीगृहातील आदिवासी मुलींना पर्यटकांसमोर नृत्य करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप आहे या संदर्भात सविस्तर चौकशी केली जाईल अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांना दिली.
पहिने जवळील चिखलवाडी येथील सर्वहारा परिवर्तन केंद्राचे वसतीगृह आदिवासी मुलींसाठी असून या ठिकाणी अशाप्रकारे मुलींना सक्ती केल्याचा आरोप आहे. या संदर्भात पालकांच्या तक्रारीवरून नाशिकच्या वाडीव्हरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काल त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार दिव्या संचेती यांनी हे वसतिगृह तसेच याच बाजू असलेले जी सेवन नेचर पार्क रिसॉर्ट केले.
संबंधित वसतीगृह चालकांवर पोलिसांनी अगोदरच गुन्हा दाखल केला आहे यासंदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.