आदिवासींची आरोग्य तपासणी हरणबारी : रोटरी क्लब आॅफ मालेगावचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:37 PM2018-01-12T23:37:34+5:302018-01-13T00:19:54+5:30
मालेगाव : येथील रोटरी क्लब आॅफ मालेगावतर्फे हरणबारी येथे आदिवासींसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.
मालेगाव : येथील रोटरी क्लब आॅफ मालेगावतर्फे हरणबारी येथे आदिवासींसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.
यात सर्वरोग निदान, नेत्र तपासणी, औषध वितरण, चष्म्यांचा नंबर काढून देणे, ज्यांना मोतीबिंदू असेल त्यांची शस्त्रक्रिया करून देणे इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रमुख प्रदीप बच्छाव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा आदिवासी आघाडीचे उपाध्यक्ष पोपट गवळी, पोलीस निरीक्षक ठाकूरवाड, सुभाष येवला, माळवाडाचे उपसरपंच गणपत बर्डे, यशवंत अहिरे, अंतापूरचे सरपंच सुनील गवळी आदी उपस्थित होते. ७५० आदिवासींनी या शिबिराचा लाभ घेतला. २१ डॉक्टर्सनी सेवा दिली. २५ आदिवासी बांधवांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. रूग्णांना रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव येथे नेण्यात आले. त्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जेवणाची, राहण्याची, औषधांची सुविधा मोफत देण्यात आली.
यात डॉ. सत्यजित शहा, राहूल बाफना, महेश तेलरांधे, तुषार झांबरे, दर्शन ठाकरे, ज्ञानेश्वर अहिरे, भुषण पाटील, अनिल भोकरे, तुषार पवार, विकास देसले, इमरान मन्सुरी, दत्ता पाटील, शकीला सय्यद, अनिल मर्चंट, दिलीप भावसार, अलफिया अन्सारी, डॉ. संजय बेंडाळे, रोहित कुंदण, रिटा मर्चंट,आदि डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी केली. यात अध्यक्ष प्रविण दशपुते, सचिव दिलीप सन्याशिव, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. महेश तेलरांधे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. अनिल मर्चंट, रोटरी आय हॉस्पिटलचे अध्यक्ष कृष्णा अमृतकर, विनोद गोरवाडकर, निरज खंडेलवाल, विनायक पाटील, राकेश डिडवाणीया, सुरेश बागड यांचा प्रमुख सहभाग होता, अशी माहिती अध्यक्ष प्रवीण दशपुते यांनी दिली.