आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था नाशिकला स्थलांतरित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:40+5:302021-07-03T04:10:40+5:30

राज्यपाल यांना सादर केलेल्या निवेदनात झिरवाळ यांनी आदिवासी भागातील विविध अडचणींसंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना सूचित करण्याचीही मागणी केली ...

Tribal Research Training Institute should be shifted to Nashik | आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था नाशिकला स्थलांतरित करावी

आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था नाशिकला स्थलांतरित करावी

googlenewsNext

राज्यपाल यांना सादर केलेल्या निवेदनात झिरवाळ यांनी आदिवासी भागातील विविध अडचणींसंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना सूचित करण्याचीही मागणी केली आहे. त्याचबरोबर वनपट्टेधारक शेतकरी वनपट्ट्यात पोत खराब असलेल्या क्षेत्रात शेती करतात, त्या जमिनीचे अधिकार अभिलेखात लागवडीखालील क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत जमाबंदी आयुक्तांना सूचना देण्यात याव्यात, तसेच ठक्कर बाप्पा योजना राज्यस्तरावर घेऊन लोकसंख्येच्या प्रमाणात एक कोटी रुपयांपर्यंत निधी वाढविण्याची मागणीही केली आहे.

भूसंपादन प्रकरणात वनपट्टेधारकांची जमीन जात असल्यास त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून वनपट्टेधारक जमिनीचा संपूर्ण मोबदला देण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्यात. तसेच १९८५ पेसा कायद्यानुसार ज्या गावांचा समावेश पेसा कायद्यात करण्यात आलेला नाही, अशा उर्वरित सर्व गावांचा समावेश या कायद्यात करण्यात यावा, वैधानिक विकास महामंडळांप्रमाणे आदिवासी विकास महामंडळास स्वायत्तता देण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे, अशी विनंतीदेखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Tribal Research Training Institute should be shifted to Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.