आदिवासी संशोधकांची ई- सायकल राज्यस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 03:03 PM2019-03-20T15:03:47+5:302019-03-20T15:04:40+5:30
पेठ -आदिवासी व दुर्गम भागातील वाडी वस्तीवर वास्तव्य करून प्रतिकूल परिस्थितीत व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या पेठ येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवसंशोधकांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून संशोधीत केलेल्या ई- सायकलला विभागीय तंत्र प्रदर्शनात प्रथम क्र मांक मिळाला असून या उपकरणाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
पेठ -आदिवासी व दुर्गम भागातील वाडी वस्तीवर वास्तव्य करून प्रतिकूल परिस्थितीत व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या पेठ येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवसंशोधकांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून संशोधीत केलेल्या ई- सायकलला विभागीय तंत्र प्रदर्शनात प्रथम क्र मांक मिळाला असून या उपकरणाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनायाने धुळे येथे विभागीय तंत्रपदर्शन आयोजित केले होते. यामध्ये नाशिक, नगर, जळगांव, नंदुरबार, धुळे या पाच जिल्हयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील नव संशोधक सहभागी झाले होते. यामध्ये पेठच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बॅटरीवर चालणार्या ई- सायकलला परिक्षकांनी प्रथम पसंती दिली.अतिशय कमी खर्चात जास्त अंतर कापणारी ही आगळी वेगळी सायकल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरली. प्राचार्य शांताराम राठोडे, विषय शिक्षक राजेश मेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली रूपाली खंबाईत, विठोबा खैरणार , रविंद्र राऊतमाळे या विद्यार्थ्यांनी ही सायकल तयार केली असून भविष्यात याचप्रमाणे विविध प्रकारचे शंसोधन करून नवनवीन संकलना प्रत्यक्षात आणला जातील असे आवाहन प्रा.शांताराम राठोड यांनी केले.