आदिवासी वस्ती उजळली प्रकाशाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:37+5:302021-08-12T04:17:37+5:30

मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील आदिवासी वस्तीवर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल ७४ वर्षांनंतर वीज आल्याने परिसर प्रकाशाने उजळला आहे. ...

The tribal settlements were illuminated by light | आदिवासी वस्ती उजळली प्रकाशाने

आदिवासी वस्ती उजळली प्रकाशाने

Next

मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील आदिवासी वस्तीवर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल ७४ वर्षांनंतर वीज आल्याने परिसर प्रकाशाने उजळला आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथील नागरिक विजेपासून वंचित असल्याचे लक्षात घेऊन येथील माजी सरपंच मधुकर साळवे यांनी आमदार छगन भुजबळ यांच्याकडे प्रस्ताव दिला. त्यानंतर कित्येक दिवसांनी आमदार निधीतून सहा लाख २० हजार रुपयांचा निधी मंजूर होऊन या आदिवासी वस्तीवर स्वतंत्र रोहित्राची उभारणी करण्यात आली. या अनुषंगाने आज वस्तीवरील सर्वच नागरिकांना लाभ मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. येथील घरगुती मीटरला तसेच कृषिपंपाला वीजपुरवठा चालू होणार असल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. याप्रसंगी संजय बनकर, उपसरपंच सखाहरी बिडवे, रघुनाथ काळे, बाळासाहेब दौंडे, अशोक दौंडे, मधुकर ढोकळे, चेअरमन शंकर काळे, विजू बिडवे, सुकदेव ढोकळे, संतोष पोटे, दत्तू पोटे, पुंडलिक गोधडे, कचरू गोधडे, दिलीप दौंडे, देवीदास शिंदे, किरण गोधडे, राजू माळी, ज्ञानेश्वर गोधडे, शांताराम पवार आदी उपस्थित होते.

------------------

फोटो : पिंपळगाव लेप येथील आदिवासी वस्तीत भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच विजेचा उजेड पडल्याने आनंद व्यक्त करताना ग्रामस्थ. (१० मानोरी)

100821\10nsk_11_10082021_13.jpg

१० मानोरी

Web Title: The tribal settlements were illuminated by light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.