कसबे सुकेणेला आदिवासी शक्ती सेनेचे आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 11:13 PM2021-11-15T23:13:31+5:302021-11-15T23:20:19+5:30
कसबे सुकेणे : येथील आदिवासी वस्ती असलेल्या वाल्मीक नगरमधील अतिक्रमित घरे शासन निर्णयानुसार कायम करावे, या मागणीसाठी सोमवार (दि. १५) पासून आदिवासी शक्ती सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
कसबे सुकेणे : येथील आदिवासी वस्ती असलेल्या वाल्मीक नगरमधील अतिक्रमित घरे शासन निर्णयानुसार कायम करावे, या मागणीसाठी सोमवार (दि. १५) पासून आदिवासी शक्ती सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
कसबे सुकेणे गावाच्या हद्दीत आदिवासी वस्ती वाल्मीक नगर असून या ठिकाणी ५० ते ६० वर्षांपासून दीडशे कुटुंब रहिवास करतात. सदरची वस्तीही अतिक्रमित कायम नसल्याने शासनाचे योजनांचे लाभ येथील आदिवासी बांधवांना मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांनी ग्रामपालिकेसमोर आदिवासी शक्ती सेना यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे.
जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू, असा पवित्रा या संघटनेचे अर्जुन गांगुर्डे व या रहिवाशांनी घेतला असून त्यांच्या मागणीचे निवेदन कसबे सुकेने ग्रामपालिकेसह जिल्हाधिकारी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले आहे. दरम्यान, याबाबत ग्रामपालिकेचे उपसरपंच धनंजय भंडारे यांनी सदरचा प्रस्ताव यापूर्वीच कसबे सुकेने ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाला पाठवला आहे. सदरचे मागणीसंदर्भात जागा कायम करण्याचे अधिकार ग्रामपालिकेला नसल्याचे सांगितले. या आमरण उपोषण आंदोलनात वाल्मीकनगरमधील अक्षय शिंगडे, दीपक जाधव, तुषार गोतरणे, योगेश गोतरणे, अर्जुन गांगुर्डे , रामदास प्रधान, गायकवाड, बापू वागले, केदू गायकवाड, देवीदास प्रधान, भारत पवार, श्रावण कोटील, आशा शिंगाडे, लताबाई गोतरणे, संगीता बोंबले, राधाबाई चोथवे, रत्ना चव्हाण, संगीता मोकाशी, मीरा पवार, वच्छला भगरे, अलका वाघ, आदींचा सहभागी झाले होते.
सुकेणे येथील वाल्मीक नगर अतिक्रमित घरे ही शासनाने त्वरित कायम करावी, आदिवासी वस्तीला लाभ मिळत नाही वारंवार पाठपुरावा निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही, त्यामुळे ग्राम पालिकेसमोर आमरण उपोषण करत आहोत.
- अर्जुन गांगुर्डे, आदिवासी शक्ती सेना