पावसाळ्यातील रानभाज्यांचा आदिवासींना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:56+5:302021-06-20T04:10:56+5:30
देवगाव : पूर्वीपासून निसर्गपूजक आणि निसर्गाच्या सान्निध्यातच डोंगर, दरी-खोऱ्यात, माळरानावर झाप बांधून निसर्ग नियमाच्या आधारित जीवनाची गुजराण करणाऱ्या आदिवासी ...
देवगाव : पूर्वीपासून निसर्गपूजक आणि निसर्गाच्या सान्निध्यातच डोंगर, दरी-खोऱ्यात, माळरानावर झाप बांधून निसर्ग नियमाच्या आधारित जीवनाची गुजराण करणाऱ्या आदिवासी बांधवांना वनस्पतिसृष्टीबरोबरच जंगलातील इतर जीवनमूल्यांचे अधिक दान लाभले आहे. त्यात जंगली रानभाज्या हे एक मोठे वरदान ठरले आहे. सध्या बाजारातील भाजीपाल्यांचे दर वाढलेले आहेत या रानभाजीपाल्याने आदिवासी बांधवांना रोजच्या आहारात अधिक दिलासा दिला आहे. शिवाय, या भाज्या आदिवासी कुटुंबांना आर्थिक आधार देणाऱ्याही ठरत आहेत.
रानभाज्या या निसर्ग उपजत असल्याने आयुर्वेदिकदृष्ट्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक ठरतात. डोंगराळ भागात, कडेकपारीत, माळरानावर धुंडाळत आदिवासी बांधव भाजीपाला मिळवत असतात. रासायनिक खते व औषधांचा भरमसाठ वापर पिकांवर होत असल्याने मानवाला अनेक आजारांचा सामना सामना करावा लागत आहे. अशावेळी नैसर्गिकरीत्या उगवलेल्या रानभाज्यांकडे कल वाढला आहे.
यावर्षी लवकर पाऊस झाल्याने रानभाज्या लवकर उगवल्या. ज्या भागात पाऊस अधिक आहे अशा जंगलात माळरान परिसरात दहिगड, रान वागाट, मोह, टोळंबा, शेवळी, बोंडारा, कुहरुळा, मोखा, पेंड्रा, या उन्हाळी हंगामातील, तर रानतेरा, आकऱ्या, उळसा, करटुल, आंबटवेल , कोळू, कांचन, रानज्योत, भरडा या भाज्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येतात. सुरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, डांग परिसर, जव्हार, मोखाडा, ठाणे, पालघर परिसर रानभाज्यांनी अधिक फुलून गेला आहे.
-------------
खताविना उगवतात रानभाज्या...
कोणत्याही खताविना उगवून आलेल्या रानभाज्या पावसाळ्यात पर्वणी असते. चवदार, पौष्टिक, औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या डोंगर-दऱ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. परंतु, एकसारख्या दिसणाऱ्या काही वनस्पती विषारीही असू शकतात. म्हणून जुन्या, जाणकार, अनुभवी व्यक्तीच या रानभाज्या शोधून आणतात. या रानभाज्यांची भाजी कशा पद्धतीने करायची याची माहितीदेखील इतरांना देतात.
-------------
कोट....
आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर जंगली रानभाज्या असून, याबाबत जुने वयस्कर व्यक्तींना भेटून माहिती घेऊन आजच्या तरुण पिढीला त्याची माहिती व्हावी या उद्देशाने संशोधन केले आहे. रानभाज्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त ठरत आल्या आहेत.
- सुभाष नारायण कामडी
फोटो- १८ आदिवासी क्रॉप
===Photopath===
180621\324918nsk_28_18062021_13.jpg
===Caption===
फोटो- १८ आदिवासी क्रॉप