आदिवासी शिक्षक, विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:57 AM2019-08-12T00:57:02+5:302019-08-12T00:57:27+5:30
महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीने आदिवासी समाजातील शिक्षक आणि विविध परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष रमेश जाधव होते.
पंचवटी : महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीने आदिवासी समाजातील शिक्षक आणि विविध परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष रमेश जाधव होते.
म्हसरूळ येथील नाथ कृपा लॉन्स येथे रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भारती पवार, महापौर रंजना भानसी, मनोहर टोपले, शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष मोतीराम पवार, निवृत्ती तळपाडे होते.
९ आॅगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी, गुणवंत शिक्षक पुरस्कार गुणगौरव आणि समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाºया समाज बांधवांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून आपले व आपल्या समाजाचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरावे तसेच समाजातील विविध अडचणी समजावून घेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन डॉ. जयश्री गांगुर्डे, सुवर्णा जोपळे यांनी तर प्रास्ताविक धर्मेंद्र बागुल यांनी केले. शिरीषकुमार पाडवी यांनी आभार मानले. कार्यक्र माला सुभाष भोये, रोडू चौधरी, सुनील गावित, अंकुश तळवे, मंगेश महाले, राहुल चौधरी, जयवंत पालवी, युवराज ठाकरे, नामदेव ठाकरे, संजय चौधरी, भाऊसिंग जाधव, पोपट घाणे, प्रकाश बळीराम, के. के. गांगुर्डे, मधुकर आवारी आदींसह नागरिक उपस्थित होते.
..यांचा झाला सत्कार
गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून नंदिनी ठाकरे, गोविंदा पवार, भाऊसाहेब नेहरे, लीलावती गायकवाड, रामदास तळपे, रंगनाथ चव्हाण, योगिनी गायकवाड, आदिवासी समाजमित्र पुरस्कार म्हणून डॉ. मंजुषा सोनार, चंद्रकांत गायकवाड, आदिवासी भूषण पुरस्कार म्हणून डी. एम. गायकवाड, डॉ. संदीप ठाकरे, डॉ. जगन सूर्यवंशी यांना तर भगवंता राऊत यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.