आदिवासी महिलेचे घर आगीच्या भक्षस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 06:26 PM2020-05-12T18:26:59+5:302020-05-12T18:27:10+5:30

पेठ -तालुक्यातील चोळमूख येथील एका वृद्ध मिहलेच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने सागवान लाकूड, भांडी, कपडे, अन्नधान्यासह संपूर्ण संसार जळून खाक झाला असून जवळपास चार लाखाचे नुकसान झाले आहे.

 Tribal woman's house on fire | आदिवासी महिलेचे घर आगीच्या भक्षस्थानी

आदिवासी महिलेचे घर आगीच्या भक्षस्थानी

Next

पेठ -तालुक्यातील चोळमूख येथील एका वृद्ध मिहलेच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने सागवान लाकूड, भांडी, कपडे, अन्नधान्यासह संपूर्ण संसार जळून खाक झाला असून जवळपास चार लाखाचे नुकसान झाले आहे.
चोळमुख येथील तुळसाबाई तुळशीराम पेंडार यांच्या मालकीच्या दोन मजली राहत्या घराला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. घराच्या छप्परातून आगीचे डोंब बाहेर पडू लागल्याने नागरिकांची एकच धावपळ ऊडाली. पाहता पाहता संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले. यामध्ये घराचे सागवान लाकूड, अन्नधान्य, कपडे, भांडी असा संपूर्ण संसाराची राख झाली. जवळपास चार लाखाचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीची भयंकर तीव्रता असल्याने यश आले नाही. तलाठी मनोज वाकतकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. आधीच कोरोनामुळे रोजगारावर गंडातर आलेल्या या कुंटूंबावर अशा प्रकारचे संकट आले आहे. संबंधितास शासकिय नियमाप्रमाने नुकसान भरपाईबाबतचा अहवात वरिष्ठांना सादर करून मंजूरीनंतर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे तहसीलदार संदिप भोसले यांनी सांगितले.

Web Title:  Tribal woman's house on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक