आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:17 PM2018-11-20T18:17:24+5:302018-11-20T18:18:25+5:30
इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या एका आदिवासी वाडीला गेल्या दहा वर्षांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त झालेल्या महिलांनी खंबाळे ते इगतपुरी पंचायत समिती असा बारा किलोमीटर अंतराचा पायी हंडामोर्चा काढला. हा मोर्चा आरंभी इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर नेण्यात आला व नंतर पंचायत समितीवर धडकला.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या एका आदिवासी वाडीला गेल्या दहा वर्षांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त झालेल्या महिलांनी खंबाळे ते इगतपुरी पंचायत समिती असा बारा किलोमीटर अंतराचा पायी हंडामोर्चा काढला. हा मोर्चा आरंभी इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर नेण्यात आला व नंतर पंचायत समितीवर धडकला.
तालुक्यातील महामार्गावर असलेल्या खंबाळे गावाच्या आदिवासी वस्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी जवळच्या नदीपात्रातून आणावे लागते. या वाडीला पिण्याचे पाणी मिळावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी अनेकदा करूनही दखल घेतली नसल्याने या वाडीतील महिला संतप्त झाल्या होत्या. सकाळी या महिलांनी संघटित होत डोक्यावर रिकामे हंडे घेत रखरखत्या उन्हात तब्बल बारा किलोमीटर अंतर पायपीट करीत खंबाळे ते इगतपुरी असा मोर्चा काढला.
हा मोर्चा इगतपुरी तहसील कार्यालयात आणण्यात आला मात्र सदर बाब पंचायत समितीच्या अखत्यारित असल्याचे समजल्याने या महिलांनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे वळविला. हा मोर्चा पंचायत समितीत दाखल झाल्यानंतर संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी किरण जाधव यांच्या दालनात प्रवेश करून गटविकास अधिकाºयांना जाब विचारला; मात्र या बाबीकडे गटविकास अधिकाºयाने गांभीर्याने न घेता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गटविकास अधिकाºयांच्या दालनात ठिय्या मांडला. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा आक्र मक पवित्रा घेतल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, या मोर्चेकरू महिलांनी दूषित पाणी आणून गटविकास अधिकाºयांकडे दिले. ग्रामसेवकाची तत्काळ बदली करावी, पिण्यास पाणी मिळावे अशी मागणी लावून धरली.
अखेर श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, तालुका महिला उपाध्यक्ष नीता गावंडा, शांताराम भगत आदींनी मध्यस्थी करीत मोर्चेकºयांची भूमिका पंचायत समिती प्रशासनाकडे मांडली. पंचायत समितीने सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
—————————————————————