आदिवासी युवकांनी घेतली वृक्ष संवर्धनाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:17+5:302021-09-10T04:19:17+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील सोनेवाडी येथे असलेल्या सोनगड किल्यावर आदिवासी युवकांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण करण्यात आले. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील सोनेवाडी येथे असलेल्या सोनगड किल्यावर आदिवासी युवकांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण करण्यात आले. त्याचे जतन करून संवर्धन करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.
सोनेवाडी येथील सोनगड किल्ल्यावर श्री खंडोबा महाराजांचे मंदिर आहे. त्याठिकाणी प्रत्येक रविवारी दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्या अनुषंगाने किल्ल्यावर आलेल्या भाविकांना झाडांच्या सावलीत बसता यावे म्हणून जवळच असणाऱ्या कागदारा येथील देवंशी बाबा मित्र मंडळाने वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने विविध जातीच्या वृक्षांचे मान्यवरांच्या उपस्थितीत रोपण करण्यात आले. आदिवासी समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मेंगाळ, सह्याद्री मंडळाचे तालुका अध्यक्ष अजय कडाळे, चापडगावचे उपसरपंच कचरू मेंगाळ, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मेंगाळ, दीपक गांगड, कैलास पथवे, तान्हाजी मेंगाळ, आबाजी आगिवले, सोमनाथ मेंगाळ, भीमा मेंगाळ, कैलास मेंगाळ, राजेंद्र पथवे, संदीप पथवे, अमोल पथवे, बाळा आव्हाड, संजय मेंगाळ, बस्तिराम मेंगाळ, विश्वनाथ आगिवले, सचिन आगिवले, एकनाथ आगिवले, काशिनाथ कडाळे आदींसह आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.