राज्यातील आदिवासी करणार मोह फुलांवर प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:20+5:302020-12-22T04:15:20+5:30
चौकट - एका केंद्रात ३०० लाभार्थी या योजनेसाठी २० लाभार्थ्यांचा एक स्वयंसहायता गट असे एकूण १५ स्वयंसहायता गट मिळून ...
चौकट -
एका केंद्रात ३०० लाभार्थी
या योजनेसाठी २० लाभार्थ्यांचा एक स्वयंसहायता गट असे एकूण १५ स्वयंसहायता गट मिळून एक वनधन केंद्र तयार झाले आहे. म्हणजे एका केंद्रात ३०० लाभार्थ्यांचा समावेश आहे शबरी वित्त व विकास महांमडळाकडून ही योजना राबविण्यात येत असून महामंडळाने २६४ केंद्र तयार केले आहेत. त्यांना दिल्लीतील ट्रायफेडने मान्यता दिली आहे. २६४ पैकी ६४ केंद्रांना केंद्र शासनाने ९ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
चौकट -
असा होणार निधीचा विनियोग
केंद्रांना मिळालेल्या निधीपैकी एका वनधन केंद्रासाठी १५ लाख रुपये देण्यात येणार आहे. यात प्रशिक्षणासाठी ५ लाख रुपये, प्रशिक्षण साहित्य व टुल किटसाठी १० लाख रुपये मिळणार आहेत.
चौकट -
जिल्हानिहाय मंजूर वनधन केंद्र
धुळे -४, नंदुरबार -५, नाशिक - ४, नांदेड-१, यवतमाळ - ९, गोंदिया - ५ , रायगड - ३, ठाणे - ४, पुणे - २, चंद्रपूर- ७ , गडचिरोली - १०, वाशिम - ४, जळगाव - २