त्रिभुवन हे चळवळीला दिशा देणारे वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:55+5:302021-01-09T04:11:55+5:30

दलित पँथर संघटनेपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे नाशिकरोडचे रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष प्रभाकर ऊर्फ प्रियकीर्ती त्रिभुवन यांचे नुकतेच निधन ...

Tribhuvan is the storm that directs the movement | त्रिभुवन हे चळवळीला दिशा देणारे वादळ

त्रिभुवन हे चळवळीला दिशा देणारे वादळ

Next

दलित पँथर संघटनेपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे नाशिकरोडचे रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष प्रभाकर ऊर्फ प्रियकीर्ती त्रिभुवन यांचे नुकतेच निधन झाले. आठवले यांनी जेलरोड येथे शुक्रवारी दुपारी त्रिभुवन यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. जेलरोडच्या राजराजेश्वरी मंगल कार्यालय आयोजित श्रध्दांजली सभेत बोलताना आठवले म्हणाले की, गरिबांसाठी लढणारा पँथरचा लढाऊ कार्यकर्ता हीच त्रिभुवन यांची ओळख होती. मनात कपट, कारस्थान न बाळगता स्पष्टपणे भूमिका मांडत जिल्ह्यातील गावागावात पँथरची छावणी स्थापन करण्याकरिता त्रिभुवन यांनी घेतलेले कष्ट विसरता येणार नाही. त्यांच्यासारखे जुने कार्यकर्ते सोबत नसते तर मलासुध्दा ही उंची गाठता आली नसती. त्रिभुवन हे उडणारे वादळ नव्हते तर आंबेडकरी चळवळीला दिशा देणारे वादळ होते. त्रिभुवन यांचे अपूर्ण राहिलेले कार्य व स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे आठवले यांनी स्पष्ट केले. यावेळी पक्षाचे नेते काकासाहेब खंबाळकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, शंकरराव काकळीज, विश्वनाथ काळे, श्रीकांत भालेराव आदींनी श्रध्दांजली वाहिली. माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नगरसेवक शरद मोरे, सचिन हांडगे, कुणाल वाघ, सुनंदा मोरे, दिलीप दासवाणी, अमोल पगारे, भारत निकम, समीर शेख, रामबाबा पठारे, शेखर भालेराव, अनिल गांगुर्डे, पवन क्षीरसागर, नारायण गायकवाड, प्रमोद बागूल, चंद्रकांत भालेराव, वत्सला त्रिभुवन, प्रियदर्शनी त्रिभुवन, मिलिंद त्रिभुवन, किशोर त्रिभुवन, श्रीधर त्रिभुवन आदीं उपस्थित होते. (फोटो ०८ आठवले)

फोटो कॅप्शन

रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष प्रियकीर्ती त्रिभुवन यांच्या श्रद्धांजली सभेत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले समवेत काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, विश्वनाथ काळे, प्रकाश लोंढे, संजय भालेराव, अमोल पगारे, त्रिभुवन कुटुंबीय व पदाधिकारी.

Web Title: Tribhuvan is the storm that directs the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.