संगीतकार खय्याम यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:10 AM2019-08-22T00:10:13+5:302019-08-22T00:11:10+5:30
ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या निधनाने कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. भावस्पर्शी संगीत देणाऱ्या महान कलावंतांपैकी खय्याम हे एक होते. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक : ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या निधनाने कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. भावस्पर्शी संगीत देणाऱ्या महान कलावंतांपैकी खय्याम हे एक होते. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक जिल्हा आॅर्केस्ट्रा असोसिएशनचे सुनील ढगे यांनी संगीतकार खय्याम यांना श्रद्धांजली अर्पण केली. खय्याम यांचे संगीत व गीत रचना श्रोत्यांच्या हृदयाला हात घालत असे.
त्यामुळे त्यांच्या रचना नेहमी लक्षात राहतील यात काहीही शंकाच नसल्याचे ढगे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या कलागुणांमुळेच शासनाने त्यांचा पद्मभूषण, फिल्मफेअर अशा अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवदेखील केला होता. कालिदास कलामंदिर येथे आयोजित या श्रध्दांजली कार्यक्रमास गायक कलाकार फारु ख पिरजादे, गोकुळ पाटील, चंचल चौधरी, राजेंद्र भदाणे, फारु ख मणियार, देबाशीष पाटील, हर्षवर्धन बच्छाव, शाहिद शेख, आदर्श बोराडे, तुषार बागुल, आमिर सोहेल, राजेंद्र क्षीरसागर यांसह कलावंत उपस्थित होते.