हांडे यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:41 AM2020-12-17T04:41:30+5:302020-12-17T04:41:30+5:30
नाशिक : मविप्र संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालयात कर्मवीर ॲड.विठ्ठलराव हांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ...
नाशिक : मविप्र संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालयात कर्मवीर ॲड.विठ्ठलराव हांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे यांनी कर्मवीर हांडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
याप्रसंगी त्यांनी हांडे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. त्यांचा मूळचा पिंड सत्यशोधक विचारांचा होता.महात्मा फुले,राजश्री शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि मार्क्सवादी विचारांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता.त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांवर अनेक चळवळी केल्या.शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, कष्टकऱ्यांचे अनेक मोर्चे काढले. मविप्र समाज संस्थेत त्यांनी दीर्घकाळ काम केले.संस्थेच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मविप्र समाज संस्थेचे माजी अध्यक्ष व सभापती म्हणून त्यांनी काम केले.ते ग्रामीण भागातील शिक्षण प्रसाराच्या बाबतीत आग्रही होते.शिक्षण हे गरिबांपर्यंत नेले पाहिजे हा विचार त्यांनी संस्थेत रुजवण्यात योगदान दिले, असेही थिगळे यांनी सांगितले. याप्रसंगी डी.पी. हळदे यांनी हांडे यांच्या जीवन कार्याचा आढावा व त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी सांगितली. या कार्यक्रमासाठी आर.के.जाधव,प्रा.जे.एस. मून तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.