महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:54+5:302021-05-27T04:15:54+5:30

नाशिक : बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहर परिसरात सामूहिक बुद्ध वंदना घेत महाकारुणी तथागताला वंदन करण्यात आले, तर बुध्द स्मारकात भिख्खू ...

Tribute to Mahakaruni Tathagata three times! | महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना !

महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना !

Next

नाशिक : बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहर परिसरात सामूहिक बुद्ध वंदना घेत महाकारुणी तथागताला वंदन करण्यात आले, तर बुध्द स्मारकात भिख्खू संघाच्या वतीने महापरित्राण पाठ करण्यात आला. बुद्धविहारांमध्येही सकाळच्या सुमारास मंगलमय वातावरणात बुद्धवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घरोघरी भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यंदा केारोनामुळे अत्यंत साधेपणाने स्मारकात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.

तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ जयंतीनिमित्ताने शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे मोजक्याच भिख्खू आणि उपासकांच्या उपस्थितीत बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. केारोनाचे निर्बंध असल्यामुळे नियमांचे पालन करीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विश्वशांतीकरिता बुद्ध स्मारकात नाशिक भिख्यु संघाच्या वतीने महापरित्राण पाठ करण्यात आला. परिसरात बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी भिख्यु संघाचे नागधम्मो महास्थवीर, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे भदन्त सुगत, भदन्द आर्यनाग, भदन्त धम्मरक्षित, भदन्त कश्यप, भदन्त संघराज, भदन्त धम्मरत्न, भदन्त धम्मआनंद, भदन्त दीपांकर, भदन्त धम्मदर्शन आदी उपस्थितीत होते. या कार्यक्रमप्रसंगी परिसरातील उपासक, उपासिकांनी बुद्ध स्मारकात जाऊन मूर्तीला वंदन केले. यंदा येथे सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली असल्याने दरवर्षी होणारी गर्दी झाली नाही.

दरम्यान, शहर परिसरात बौद्ध बांधवांनी घराघरांत बुद्ध पौर्णिमा साधेपणाने साजरी केली. मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्प अर्पण करण्यात आले. काेरोना नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकरोड येथील महाबोधी बुद्धविहारातही सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. पंचवटी, सिडको, सातपूर, देवळाली कॅम्प, भगूर, गंगापूर, म्हसरूळ, मखमलाबाद, विल्होळी येथील बुद्धविहारांमध्ये छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

--इन्फो--

सोशल मीडियावर शुभेच्छा

क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते, अशा संदेशासह एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने सोशल मीडियावर बुद्ध प्रतिमांसह समाजबांधवांनी एकमेकांना मंगलमय शुभेच्छा दिल्या. बौद्धस्थळे आणि बुद्ध तत्त्वज्ञान संदेशाच्या सोशल मीडियावर अदान-प्रदान करण्यात आले. दिवसभर संदेशाच्या माध्यमातून जयंती साजरी करण्यात आली.

Web Title: Tribute to Mahakaruni Tathagata three times!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.