महाराजा सयाजीराव गायकवाड यांना स्मृतिदिनी आदरांजली (जन्म १६६३, १८७५ ते १९३९ सालादरम्यान बडोदा संस्थानाचे राजे होते, साल कुठेतर चुकत आहे...)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:47+5:302021-02-09T04:16:47+5:30

अध्यक्षस्थानी विश्वासराव गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून जगन्नाथ बच्छाव, निंबा बच्छाव उपस्थित होते. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा ...

Tribute to Maharaja Sayajirao Gaikwad on Smriti Day | महाराजा सयाजीराव गायकवाड यांना स्मृतिदिनी आदरांजली (जन्म १६६३, १८७५ ते १९३९ सालादरम्यान बडोदा संस्थानाचे राजे होते, साल कुठेतर चुकत आहे...)

महाराजा सयाजीराव गायकवाड यांना स्मृतिदिनी आदरांजली (जन्म १६६३, १८७५ ते १९३९ सालादरम्यान बडोदा संस्थानाचे राजे होते, साल कुठेतर चुकत आहे...)

Next

अध्यक्षस्थानी विश्वासराव गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून जगन्नाथ बच्छाव, निंबा बच्छाव उपस्थित होते. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म ११ मार्च १६६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवळाणे या गावी झाला. बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर बडोद्यामध्ये राजघराण्यात ते दत्तक गेले आणि महाराजा म्हणून सिंहासनावर आरूढ झाले. महाराजा सयाजीराव गायकवाड हे १८७५ ते १९३९ सालादरम्यान बडोदा संस्थानाचे राजे होते. न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय अशा सुधारणा त्यांनी आणल्या, असे प्रतिपादन विश्वास गायकवाड यांनी केले. ग्रंथपाल चंद्रकांत कुलकर्णी यांचेही भाषण झाले. वाचनालयाचे अध्यक्ष नितीन गायकवाड, पद्माकर गायकवाड, बापू वाघ, बाळू बच्छाव, प्रशांत कुलकर्णी सर, समाधान बच्छाव, बंटी पिंजारी, कैलास बच्छाव, शरद बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रंथपाल चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले.

Web Title: Tribute to Maharaja Sayajirao Gaikwad on Smriti Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.