भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये शहीद जवानांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:41+5:302021-07-28T04:14:41+5:30

नाशिक : भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये सोमवारी (दि. २६) कारगिल विजय दिनानिमित्त युद्धात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यात ...

Tribute to the martyred soldiers at Bhonsla Military School | भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये शहीद जवानांना मानवंदना

भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये शहीद जवानांना मानवंदना

googlenewsNext

नाशिक : भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये सोमवारी (दि. २६) कारगिल विजय दिनानिमित्त युद्धात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यात आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रम संस्थेच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये साजरा करण्यात आलेल्या कारगिल विजय दिन सोहळ्यास कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचे कमांडंट ब्रिगेडिअर संजय वडेरा (सेना मेडल ) हे प्रमुख पाुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच लेफ्टनंट कर्नल संदेश कदम, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, सी.एच.एम.ई. सोसायटीचे सहकार्यवाहक प्रा.डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे, शाळेचे समादेशक ब्रिगेडिअर एम. एम. मसूर विशिष्ट सेवा मेडल (नि), आदींच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. दरम्यान, एनडीएच्या परीक्षेमध्ये पास झालेले योगीराज बुद्धिवंत, लक्षीन पटेल, अंश श्रीराम ,शिवम देशपांडे, अक्षय कोटकर, अपूर्व वडनेर यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळेच्या पालक समितीचे अध्यक्ष शीतल देशपांडे, शालेय समितीचे अध्यक्ष अतुल बेदरकर, सैनिकी मुख्य प्रशिक्षण अधिकारी जे. के. मिश्रा, लेफ्टनंट कर्नल राजेंद्र मुतालिक, सहसचिव ॲड. सुहास जपे, लेफ्टनंट कर्नल उदय पोल उपस्थित होते. सूत्रसंचालन वाय. सी. चकोर व डी. एम. धनाईत यांनी केले. शाळेचे प्राचार्य आर. जी. जगताप यांनी आभार मानले.

260721\084726nsk_30_26072021_13.jpg

 भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये  कारगिल विजय दिनानिमित्त  शहिदांना मानवंदाना देताना जवान व अधिकारी 

Web Title: Tribute to the martyred soldiers at Bhonsla Military School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.