मौजे सुकेणेत शहीद जवानांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 08:37 PM2020-06-21T20:37:08+5:302020-06-21T23:58:45+5:30
कसबेसुकेणे : चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना मौजे सुकेणे येथे पंचक्र ोशीतील ग्रामस्थ, सुकेणा आर्मी आणि कसबेसुकेणे पोलिसांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच चीनच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
कसबेसुकेणे : चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना मौजे सुकेणे येथे पंचक्र ोशीतील ग्रामस्थ, सुकेणा आर्मी आणि कसबेसुकेणे पोलिसांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच चीनच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मौजे सुकेणे येथील शहीद संदीप मोगल स्मारकजवळ झालेल्या या श्रद्धांजली परेडमध्ये कसबे-सुकेणे पोलिसांनी आदरांजली वाहिली. यावेळी मौजे सुकेणेचे उपसरपंच सचिन मोगल, रामदास घुमरे, धनंजय भंडारे, छगन जाधव, विजय औसरकर, नितीन मोगल, सुयोग गुंजाळ, अरु ण भंडारे यांनी चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तु खरेदी करण्याचे आवाहन केले. साहेबराव पवार, सौरभ हंडोरे, राहुल जाधव, रमाकांत हंडोरे, ललित तीवाटणे, राहुल जाधव, अरु ण भंडारे यांनी परेडमध्ये सहभाग घेतला.
तसेच मालेगाव येथुन सेवा देऊन परतलेल्या पोलिस कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा चव्हाण, संदिप राहणे, आनंद भंडारे, सुधीर जाधव, शरद जाधव, संजय मोगल, कसबे-सुकेणेचे उपसरपंच अतुल भंडारे, प्रितेश भराडे, अभिजीत सोनवणी, किशोर कर्डक, उत्तम देशमुख, साहेबराव पवार, हेमंत मोगल, दिलीप चव्हाण, विजय गडाख, केदु भोई आदी उपस्थित होते.कसबेसुकेणेला चीनी वस्तुंची होळीकसबेसुकेणे : चिनने सुरू केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कसबे-सुकेणे येथील पोळा वेशीसमोर चीनी वस्तुंची होळी करत सर्वपक्षीय नागरीकांनी निषेध व्यक्त केला. कसबे-सुकेणे येथील पोळा वेशीसमोर नागरिकांनी चिनी वस्तुंची होळी करत निषेध व्यक्त केला. माजी सरपंच नाना पाटील, उपसरपंच अतुल भंडारे, धनंजय भंडारे, छगन जाधव, विजय औसरकर , आदी उपस्थित होते. कसबेसुकेणे बाजारपेठेत चिनी वस्तुंना बंदी घालून नागरिकांनी स्वदेशी बनावटीच्या वस्तु खरेदी करण्याचे आवाहन केले.