मालेगावसह परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:09 AM2020-12-07T04:09:47+5:302020-12-07T04:09:47+5:30
नेहरू विद्यालय, पाटणे मालेगाव : तालुक्यातील पाटणेतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात अध्यक्षस्थानी के.पी. अहिरे होते. बी. एस. महाजन ...
नेहरू विद्यालय, पाटणे
मालेगाव : तालुक्यातील पाटणेतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात अध्यक्षस्थानी के.पी. अहिरे होते. बी. एस. महाजन यांनी प्रास्ताविक केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन एस. डी. अहिरे यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे पूजन श्रीमती एन. एस. बच्छाव यांनी केले. मुख्याध्यापक आर.एस, अहिरे यांनी मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सूत्रसंचालन के. बी. धनेश्वर यांनी केले.
एलव्हीएच विद्यालय, कॅम्प
मालेगाव: येथील एलव्हीएच विद्यालयात मुख्याध्यापक दिनेश पवार त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शिक्षक श्रीमती एम. बी. पवार, आर.के. थोरात यांनी भाषणे केली. मुख्याध्यापक पवार यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीमती बी.एम. अहिरे केले. आभार एस. पी. धनवट यांनी मानले.
आरबीएच कन्या विद्यालय
मालेगाव : येथील आरबीएच कन्या विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अलका जोंधळे होत्या. जोंधळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ऑनलाइन भाषण व गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना बक्षीस जाहीर करण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्रीमती के. डी. पवार, सुचरिता ठाकरे, पर्यवेक्षक श्रीमती पी. सी. पाटील, नूरजहाँ शेख, ज्युनिअर विभागप्रमुख जे. सी. शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन माधवी नेरकर यांनी केले. आभार वैशाली पाटील यांनी मानले.
भारत विद्यालय, कॅम्प
मालेगाव : कॅम्पातील भारत विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कल्पना अहिरे होत्या. त्यांनी प्रतिमपूजन केले. प्रमुख पाहुण्या सुशीला आहिरे होत्या. यावेळी मनीषा साईनकर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन दीपाली बिडगर यांनी केले. संजय पवार यांनी आभार मानले.
केबीएच विद्यालय, कॅम्प
मालेगाव: येथील केबीएच विद्यालयात अध्यक्षस्थानी उपप्राचार्य सुनील बागुल होते. मुख्याध्यापक अनिल पवार यांनी प्रतिमपूजन केले. उपप्राचार्य रवींद्र शिरूडे ,पर्यवेक्षक संतोष सावंत, विलास पगार, निवृत्ती निकम, ज्येष्ठ प्रा. प्रफुल्ल निकम, व्याख्याते एस.ओ. भामरे, दुपार सत्रातील सांस्कृतिक विभागप्रमुख रोहिणी ठोके, मनीषा आहेर, आनंद भालेराव उपस्थित होते. एस.ओ.पवार यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार राजेश धनवट यांनी मानले.
यावेळी प्रवीण पाटील, नितीन गवळी, व्यंकट मगर ,एन.डी. शिरोळे, के. डी. देवरे, टी. यू. देवरे, सचिन लिंगायत, ए.के. खेडकर, एस.आर. नेरकर, एस.टी. पाटील, आनंद भालेराव, एस. टी. पवार, एस.टी. पाटील, के.वाय. देवरे, पी.जे. पवार, दीपक रत्नपारखी आदी शिक्षक उपस्थित होते.