दिल्ली आंदोलनामधील शहीद शेतकऱ्यांना नाशकात आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:22 IST2020-12-21T00:21:47+5:302020-12-21T00:22:12+5:30
दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरीविरोधी कायद्याविरोधात आंदोलनामध्ये ४० हून अधिक शेतकरी शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आदरांजली वाहण्यात आली.

शहीद शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मेधा पाटकर, अनिता पगारे आणि अन्य पदाधिकारी.
नाशिक: दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरीविरोधी कायद्याविरोधात आंदोलनामध्ये ४० हून अधिक शेतकरी शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आदरांजली वाहण्यात आली.
या आदरांजलीनंतर झालेल्या सभेस मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. तसेच २१ तारखेला नाशिक येथून ५ हजार शेतकरी दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असल्याचे सांगितले. २२ तारखेला मुंबईत रिलायन्स मालकाच्या घरावर आंदोलन होत असून यात शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकार आंदोलन बदनाम करत आहे याचा निषेध केला. याप्रसंगी नगरसेवक गुरुमित बग्गा, योगेश कापसे, संजय मंगू, किरण मोहिते आदींनी मनोगत व्यक्त केले. समारोप किसान सभा राज्य सचिव राजू देसले यांनी केला. लढणाऱ्या बळीराजाला साथ द्यावी. दिल्ली शेतकरी आंदोलन समर्थनार्थ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक जनआंदोलनच्या राज्य समानव्यक पगारे यांनी केले. या प्रसंगी ॲड. प्रभाकर वायचले, ॲड. शरद कोकोटे, पद्माकर इंगळे, अभिजित गोसावी, गिरीश उगले पाटील, सचिन मालेगावकर, मुकुंद दीक्षित, संविधान गायकवाड आदी परिवर्तनवादी पक्ष संघटना, संस्था उपस्थित होते. शहीद शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.