पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:19 AM2021-02-17T04:19:30+5:302021-02-17T04:19:30+5:30
----------------- हनुमाननगर शाळेत कोरोनासह शैक्षणिक जनजागृती पेठ -कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच ...
-----------------
हनुमाननगर शाळेत कोरोनासह शैक्षणिक जनजागृती
पेठ -कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच कोरोना बाबत पालक व मुलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी पेठ तालुक्यातील हनुमाननगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला पालकांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. आदिवासी कवी देवदत्त चौधरी यांनी बोलीभाषेतील कविता सादर केल्या. मंदा जाधव यांनी महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिक्षक कुंभार, दिलीप खंबाईत यांचेसह महिला उपस्थित होत्या.
---------------
बीडकर महाविद्यालयास उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट
पेठ -डांग सेवा मंडळ नाशिक संचालित दादासाहेब बीडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील उद्योजक केंद्राला दिंडोरी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी भेट देऊन फाईल व स्टेशनरी प्रोजेक्ट तसेच ऑटोमोबाईल्स कार्यशाळेची पाहणी केली. याप्रसंगी तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, प्राचार्य डॉ.रघुनाथ टोचे यांचेसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
----------------------
तहसीलदारांसह पोलीस निरीक्षकांनी घेतली कोरोना लस
पेठ -येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण केंद्रावर तहसीलदार संदीप भोसले, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांचेसह पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना लसीकरण करण्यात आले असून सदरची लस सुरक्षित असून आरोग्य, पोलीस, महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतीही शंका न बाळगता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
पेठ शहरात माघी गणेश जयंती साजरी
पेठ -शहरासह तालुक्यातील श्री गणेश मंदिरात भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करून माघी गणेश जयंती साजरी करण्यात आली. येथील मारूती मंदिरात गणेश जयंती निमित्त श्रीमद् भागवत सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी शहरातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
----------------
महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची वाढली वर्दळ
पेठ -राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनंतर वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आल्याने पेठ शहरात खेड्यावरून येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पेठ बसस्थानकात गर्दी वाढू लागली असून परिवहन महामंडळाच्यावतीने बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.