नाशिकच्या आखाड्यांचे यंदा त्र्यंबकलाही स्नान
By admin | Published: June 4, 2015 12:29 AM2015-06-04T00:29:31+5:302015-06-04T00:33:41+5:30
शेकडो वर्षांची परंपरा बदलणार : महंत ग्यानदास महाराज यांची पत्रकार परिषदेत माहिती
नाशिकच्या आखाड्यांचे यंदा त्र्यंबकलाही स्नानशेकडो वर्षांची परंपरा बदलणार : महंत ग्यानदास महाराज यांची पत्रकार परिषदेत माहिती नाशिक : शैव आणि वैष्णव आखाड्यातील वाद मिटून समन्वय व्हावा, यासाठी पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे दोन्ही पंथीयांना स्नानाचे ठिकाण निश्चित केले असले, तरी त्र्यंबकेश्वर येथे वैष्णव पंथीयांना स्नानासाठी वेळ राखीव ठेवला जातो. आजवर वैष्णव पंथीयांनी त्र्यंबकेश्वरी स्नान केले नसले तरी, यंदा मात्र नाशिकमधील वैष्णव आखाडे २५ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नान करणार आहेत.
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी बुुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिकमध्ये वैष्णवांचे तीन, तर त्र्यंबकेश्वरी शैव पंथीयांचे दहा आखाड्यांचे साधू- महंत स्नान करतात. पूर्वी शैव आणि वैष्णव हे नाशिक शहरानजीक गंगापूर धरणाजवळ स्नान करीत. परंतु शेकडो वर्षांपूर्वी शैव आणि वैष्णव यांच्यात स्नानावरून वाद
झाले आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने शेकडो साधूंना प्राण
गमवावे लागले. त्यावेळी पेशव्यांनी
शैव पंथीय साधू त्र्यंबकेश्वर आणि
वैष्णव पंथीय साधू नाशिकच्या रामकुंडात स्नान करतील, असा निवाडा दिला
होता. (पान २ वर)
त्यानुसार आजपर्यंत परंपरा सुरू असली तरी, त्र्यंबकेश्वरी वैष्णव पंथीयांना पर्वणीच्या दिवशी दोन तास स्नानासाठी राखीव असतात. पेशव्यांनी तशी सोय करून दिली आहे; परंतु नाशिकचे आखाडे जात नाहीत. यंदा मात्र नाशिकचे वैष्णव पंथीय त्र्यंबकेश्वरलाही स्नान करतील, अशी माहिती महंत ग्यानदास यांनी दिली.
कुंभमेळ्यात यंदा २९ आॅगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पर्वणी कालावधीत स्नान होणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये १८ सप्टेंबर रोजी तिसरे आणि अखेरचे शाहीस्नान होणार असून, त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबर रोजी अखेरचे शाहीस्नान होईल. त्याच दिवशी नाशिकचे आखाडे त्र्यंबकेश्वरी जातील, असे त्यांनी सांगितले.
..इन्फो...
वाद निर्माण करायचा नाही, पण...
कुंभमेळा खरा कुठे नाशिक की त्र्यंबकेश्वर याबाबत त्र्यंबकेश्वरच्या महंतांनी अलीकडेच घेतलेल्या भूमिकेविषयी बोलताना महंत ग्यानदास यांनी कुंभमेळा नाशिकलाच भरतो. पुराणात नाशिकचाच उल्लेख आहे, असे स्पष्ट करून महंत ग्यानदास यांनी त्र्यंबकेश्वर येथेही स्नानाचे महत्त्व आहे. मी त्यांचा कधीही अनादर करणार नाही आणि कोणीही करू नये, त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्णातच आहे, त्र्यंबकेश्वर जिल्ह्णात नाही यातच सारे प्रमाण मिळते, असेही ते म्हणाले.