ट्रकला दुचाकीची धडक; दोन जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:32 AM2018-01-29T00:32:36+5:302018-01-29T00:33:22+5:30
उड्डाणपुलावरील उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात कॅनडा कॉर्नर व दिंडोरी रोडवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि़२८) पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील औरंगाबाद नाका परिसरात घडली़ आकाश रामदास काखे (२५, राहणार किशोरचंद्र हौसिंग सोसायटी, कॅनडा कॉर्नर, नाशिक) व त्याचा मित्र रोशन ऊर्फ तन्मय जगन्नाथ ओझरकर (रा़ वेदश्री रो-हाउस, आकाश पेट्रोलपंपाजवळ, दिंडोरीरोड) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत़
नाशिक : उड्डाणपुलावरील उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात कॅनडा कॉर्नर व दिंडोरी रोडवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि़२८) पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील औरंगाबाद नाका परिसरात घडली़ आकाश रामदास काखे (२५, राहणार किशोरचंद्र हौसिंग सोसायटी, कॅनडा कॉर्नर, नाशिक) व त्याचा मित्र रोशन ऊर्फ तन्मय जगन्नाथ ओझरकर (रा़ वेदश्री रो-हाउस, आकाश पेट्रोलपंपाजवळ, दिंडोरीरोड) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आकाश व रोशन हे पल्सर दुचाकीने (एमएच १५, डीएक्स ८४७२) द्वारका उड्डाणपुलावरून आडगावकडे जात होते़ औरंगाबाद नाका परिसरातील उड्डाणपुलावरील पोल क्रमांक २१ च्या दरम्यान तांत्रिक बिघाड झालेला मालवाहू ट्रक (सीजी ०४, जेसी ७५१४) उभा होता़ भरधाव जाणाºया आकाश व रोशन यांना उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी ट्रकला पाठीमागून जाऊन आदळली़ हा अपघात इतका गंभीर होता की या दोघांचा जागीच मृत्यू झाला़
या अपघाताची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली़ या दोघांनाही पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्यांचा अपघातानंतर लगेच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले़
दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़