नाशिक विधान परिषदेत रंगणार तिरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:41 PM2018-05-07T16:41:24+5:302018-05-07T16:41:24+5:30
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठीच्या रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी सोमवारी (दि.7) निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.
नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठीच्या रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी सोमवारी (दि.7) निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे परवेझ कोकणी यांच्यावर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी दबाव आणला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु कोकणी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपला अर्ज काम ठेवल्याने पक्षीय बलाबल व बदलत्या राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमिवर राष्ट्रवादीचे अॅड.शिवाजी सहाणे शिवसेनेचे नरेंद्र दराडे व अपक्ष परवेझ कोकणी यांच्यातच तिरंगी लढत बघायला मिळणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अॅड. शिवाजी सहाणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहे. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड वाटत असले तरी अॅड. सहाणे शिवसेनेत असताना त्यांना मानणारा एक गट होता. परंतु पक्षाने त्यांना तिक ीट नाकारल्यामुळे हा गट नाराज असून शिवसेना भाजपने युती केल्यानंतरही त्र्यंबक नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे परवेझ कोकणी यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे युतीची काही मते विभागली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अॅड. सहाणो यांना त्यांचे बेरजेचे राजकारण पाहून ऐणवेळी उमेदवारी जाहीर केली आहे. गत विधान परिषद निवडणुकीतही अॅड. सहाणे यांनी पक्षीय बलाबल तुलनेत कमी असताना आमदार जयंत जाधव यांना काट्याची टक्कर दिली होती. या पाश्र्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड वाटत असतानाही कोकणी यांचा अर्ज कायम राहिल्याने या लढतीत चूरस निर्माण झाली आहे.