त्र्यंबकेश्वरी रोडरोमिओंचा उपद्रव

By admin | Published: July 22, 2014 10:20 PM2014-07-22T22:20:31+5:302014-07-23T00:29:31+5:30

बंदोबस्ताची मागणी : विद्यार्थिनी त्रस्त

Trident of Trimbakeshwari Roadroms | त्र्यंबकेश्वरी रोडरोमिओंचा उपद्रव

त्र्यंबकेश्वरी रोडरोमिओंचा उपद्रव

Next

त्र्यंबकेश्वर : येथील शाळा-महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस बाहेर उभे राहून मुलींची छेडछाड करणे आदि गैरप्रकार करणाऱ्या रोडरोमिओंचा सुळसुळाट वाढला असून, त्यांच्या त्रासाला कंटाळून मुली त्रस्त झाल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे पालक पोलिसांकडे जाऊन तक्रार करायला देण्याची हिंमत करीत नाही. उलट निमूटपणे हा त्रास सहन करीत असतात. त्र्यंबकमध्ये आठवीनंतरच्या मुली, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, मैत्रिणींच्या घोळक्यांसह शाळेत जात असल्या किंवा शाळा सुटल्यानंतर रस्त्याने ये-जा करतात. परीक्षेच्या वेळी मुलींना कॉप्या पुरविणे वगैरे करून मदत करण्यासाठी आतूर राहतात. जेणेकरून त्यांना इम्पे्रशन मारण्याचा प्रयत्न करतात. अशी जेव्हा तक्रार (अर्थात आकस ठेवून तक्रारही नको) नागरिकांमध्ये होत असेल तर पोलिसांतर्फेच मुलींच्या जाण्या-येण्याच्या वेळी शाळाबाहेर उभे राहून अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करू शकत नाही का? ट्रॅफिकला पाच पाच पोलीस तैनात करून पोलिसांना काय साध्य करायचे असते हाही प्रश्न गावात चर्चेचा विषय आहे. तक्रारदाराने तक्रार दिल्याशिवाय पोलीस कारवाई होऊ शकत नाही पण अशा तक्रारी येऊच नये यासाठी किमान दोन पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यास काय हरकत आहे असा गावात चर्चेचा विषय ठरला आहे. त्र्यंबक पोलिसांनी या सर्व गैरबाबीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरात आहे. शाळा कॉलेजच्या प्राचार्य-प्राध्यापकांनी देखील याबाबत पोलिसांना पत्र द्यावे, नव्हे तसे पत्र यापूर्वी देखील दिल्याचे शाळांकडून सांगितले गेले.
(वार्ताहर)

Web Title: Trident of Trimbakeshwari Roadroms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.