त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 06:20 PM2019-01-11T18:20:08+5:302019-01-11T18:20:27+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा परिसरातील कायरीची बारी, देवभात माळ शिवारात बिबट्याचे दहशत निर्माण केली असून, झापावर राहत असलेले बुधा लहारे रात्री झोपेत असाताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला मात्र पांघरून असल्याने त्यांचा जीव वाचला. वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा परिसरातील कायरीची बारी, देवभात माळ शिवारात बिबट्याचे दहशत निर्माण केली असून, झापावर राहत असलेले बुधा लहारे रात्री झोपेत असाताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला मात्र पांघरून असल्याने त्यांचा जीव वाचला. वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
गावठा परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून अनेकांना बिबट्याचे बछड्यासह दर्शन होत आहे. गेल्या दोन दिवसांत बिबट्याने झापावरील कुत्रे, कोंबडया फस्त केल्या आहेत. गावठा परिसरातील कायरीची बारी, देवभात माळ परिसरात झापावर वास्तव्यात असलेल्या शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. जनावरे, कोंबड्या, कुत्रे यांच्या संरक्षणासाठी झापाच्या बाहेर झोपलेले लहारे यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. कडाक्याची थंडी असल्याने लहारे यांनी दोन-तीन गोधड्या अंगावर पांघरून घेतल्या होत्या. बिबट्याने गोधडीवर हल्ला चढवीत पलायन केल्याने लहारे यांनी सुटकेचा नि:स्वास सोडला.
परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे रात्रीच्या सुमारास ये-जा करणाºया वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झापावरील जनावरे, शेळ्याच्या संरक्षणासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश लहारे, बुधा लहारे, लक्ष्मण लहारे, केशव लहारे, नामदेव आंबेकर, विलास लहारे, दौलत जाधव, पुंडलिक लहारे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.