तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबकला सज्जता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 06:10 PM2018-08-23T18:10:06+5:302018-08-23T18:10:19+5:30

श्रावण मिहन्याच्या नियोजनाच्या पाशर््वभूमीवर दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी आॅगस्ट महिन्यातील पिहल्याच आठवड्यात संपुर्ण श्रावण मिहन्याच्या नियोजनासाठी तहसिलदार कार्यालयात बैठक घेउन श्रावण महिना सुरु होण्यापुर्वीच बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्व यंत्रणांनी आगामी श्रावण महिन्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे असे बजावले होते. आता दोन श्रावणी सोमवार पार पडले आहेत. आता सर्वात मोठी परीक्षा तिस-या श्रावणी सोमवारची आहे.

Trilanka ready for the third shadow Monday! | तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबकला सज्जता!

तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबकला सज्जता!

Next

त्र्यंबकेश्वर : श्रावण मिहन्याच्या नियोजनाच्या पाशर््वभूमीवर दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी आॅगस्ट महिन्यातील पिहल्याच आठवड्यात संपुर्ण श्रावण मिहन्याच्या नियोजनासाठी तहसिलदार कार्यालयात बैठक घेउन श्रावण महिना सुरु होण्यापुर्वीच बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्व यंत्रणांनी आगामी श्रावण महिन्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे असे बजावले होते. आता दोन श्रावणी सोमवार पार पडले आहेत. आता सर्वात मोठी परीक्षा तिस-या श्रावणी सोमवारची आहे. यासाठी काल तहसिलदार महेन्द्र पवार यांनी त्याच बैठकीचा संदर्भ घेऊन सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीला नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, आरोग्य सभापती विष्णु दोबाडे, मुख्याधिकारी डॉ चेतना मानुरे केरूरे, सागर उजे आदी उपस्थित होते. पहिला आणि दुसरा श्रावणी सोमवार पार पडले आहेत. आता प्रशासना पुढे लक्ष्य आहे ते येत्या तिस-या श्रावण सोमवारचे ! सुमारे ४ ते ५ लक्ष भाविक दर्शन परिक्र मेसाठी ब्रम्हगिरी व त्र्यंबकेश्वर येथे येतील. असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यादृष्टीने भाविक व प्रदक्षिणार्थी व तिस-या श्रावण सोमवारच्या नियोजनात कोणतीही
उणीव राहणार नाही यांची सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी नोंद घ्यावी. असे तहसिलदार यांनी काल झालेल्या नगरपरिषद सभागृहात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.

यावेळी आरोग्य, पोलीस बळ नगरपालिका, परिवहन महामंडळ आदींनी काय काय नियोजन केले आहे, याबाबत आढावा घेतला. त्याप्रमाणे आताही तेच नियोजन करा, व संबंधित सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे.

कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची ही दक्षता घेतली गेली पाहिजे.

Web Title: Trilanka ready for the third shadow Monday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.