वैकुंठी चतुर्दशीसाठी त्र्यंबक सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:09 AM2019-11-09T01:09:10+5:302019-11-09T01:11:12+5:30
वैकुंठी चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पारंपरिक रथ मिरवणुकीसाठी देवस्थान संस्थान सज्ज झाले आहे. देशातील जगन्नाथपुरीच्या खालोखाल या रथाचा क्रमांक लागतो. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पदरी भव्य रथ आहे. आहे. त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचा रथ पेशवेकालीन सरदार रघुनाथराव विंचूरकर यांनी सन १७३७ संस्थानला प्रदान केला आहे.
त्र्यंबकेश्वर : वैकुंठी चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पारंपरिक रथ मिरवणुकीसाठी देवस्थान संस्थान सज्ज झाले आहे. देशातील जगन्नाथपुरीच्या खालोखाल या रथाचा क्रमांक लागतो. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पदरी भव्य रथ आहे. आहे. त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचा रथ पेशवेकालीन सरदार रघुनाथराव विंचूरकर यांनी सन १७३७ संस्थानला प्रदान केला आहे.
याशिवाय रथोत्सवासाठी निफाड तालुक्यातील विंचूर येथील शेकडो एकर जमीन देवस्थान न्यासला अर्पण केली. परिणामी वर्षातून एकदाच काढण्यात आलेला व गावातून मिरविण्यात येणारा रथोत्सव रोषणाई, आतषबाजीसह साजरा केला जातो. हा रथ अंदाजे ३१ फूट उंच असून, संपूर्ण रथाचे काम शिसवी या चिवट लाकडात करण्यात आले आहे.
पूर्वी हा दोन्ही बाजूला कासरे लावून लोकांनी ओढण्याची सोय केली होती. तथापि रथ नियंत्रित करण्यात वारंवार अडथळे येऊ
लागले. विशेष म्हणजे रथ अत्यंत खिळखिळा झाल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सोल ट्रस्टी हनुमंत जोगळेकर यांनी सन १९६५ साली सांगली येथील कारागीर आणून त्यांनी संपूर्ण रथ आवळुन कासऱ्यांद्वारे रथ ओढण्याची पद्धत बंद करून दोन ते तीन बैलजोड्यांनी ओढण्याची पद्धत सुरू केली.
दरम्यान, रथावर नवग्रहाच्या मूर्ती असून, संपूर्ण रथ देव-देवतांच्या मूर्तींनी सजलेला आहे.
आकर्षक रंगसंगतीत येथील रंग कारागीर गुरु देव आहेर यांनी सदर रथ साकारला आहे.
ग्रामदेवतेला गाडाभर भाताचा नैवेद्य
कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी रथ मिरवणूक अर्थात गावात रथोत्सव असतो. त्याच दिवशी दुपारी १२ वाजता ग्रामदेवता महादेवीला रेडा व बैल असलेल्या गाडीत भात नैवेद्याची पारंपरिक प्रथा आहे. ही प्रथा व्यवस्थापक पेंडोळे, देशमुख, महाजन, दीक्षित, मुळे, कुलकर्णी, खांडेकर, घैसास आदी ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत व मंत्रोच्चारात ग्रामदेवता मरीआई तथा महादेवीला गाडाभर भात अर्पण केला जातो, तर रेड्याच्या प्रातिनिधिक स्वरूपात मातेच्या मंदिरासमोर कोहळा कापून त्याचे तुकडे करून चारी दिशांना फेकले जातात.