त्र्यंबक नगरपालिका : सुमारे नऊ कोटींचा अर्थसंकल्प

By Admin | Published: February 29, 2016 10:21 PM2016-02-29T22:21:09+5:302016-02-29T22:21:51+5:30

शिलकी अंदाजपत्रक सादर

Trimbak Nagarpalika: A budget of about nine crores | त्र्यंबक नगरपालिका : सुमारे नऊ कोटींचा अर्थसंकल्प

त्र्यंबक नगरपालिका : सुमारे नऊ कोटींचा अर्थसंकल्प

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा ८ कोटी ७० लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक मुख्याधिकारी निवृत्ती नागरे व प्रमुख लेखापाल धनश्री पैठणकर यांनी रविवारी सभागृहापुढे सादर केला.
सभेत अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात येऊन आवश्यक सूचना करून हा अर्थसंकल्प ९ कोटींपर्यंत नेला. यात काही कर वाढीबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घरामागे स्वच्छता कर रु. १००, तर हॉटेलचालकांना रु. ३००, पालिका गाळ्यांचे दर तीन वर्षांनी रिव्हाईज भाडे वाढ होणार, पोटभाडेकरूंचीही चौकशी होणार, वाहनतळ फी वाढणार, खासगी नळांना मीटर बसणार व त्याप्रमाणे यापुढे पाणीपट्टी आकारणी होणार, बांधकाम परवान्यांची फी वाढणार, विकास शुल्कात वाढ होणार आहे. याशिवाय नगरसेवक धनंजय तुंगार, उपनगराध्यक्ष संतोष कदम, विरोधी गटप्रमुख रवींद्र सोनवणे, योगेश तुंगार, रवींद्र गमे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, अनघा फडके आदिंच्या चर्चेतून काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. पालिकेपुढे सध्या कचरा डेपोचा महत्त्वाचा विषयी आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या नगरसेवकांनी आपापसातील वाद- मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एक होऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. अंदाजपत्रकीय सभेत तसे दृश्य पहावयास मिळाले. विरोधी सदस्यांना विश्वासात घेऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
प्रमुख लेखापाल यांनी तयार केलेला अर्थसंकल्प सभासदांनी दुरुस्तीसह मंजूर केला. सभेसाठी नगराध्यक्ष विजया लढ्ढा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, धनंजय तुंगार, योगेश तुंगार, अनघा फडके, रवींद्र सोनवणे, रवींद्र गमे, यशोदा अडसरे, यशवंत भोये, शकुंतला वाटाणे, अंजना कडलग, अलका शिरसाट, सिंधू मधे आदिंसह अभियंता प्रशांत जुन्नरे, दीपक बंगाळ, संजय मिसर, पाणीपुरवठा अभियंता पूर्वा माळी, मधुकर माळी, के.व्ही. ठाकरे, हिरामण ठाकरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Trimbak Nagarpalika: A budget of about nine crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.