त्र्यंबक नाशिक सकाळी बस सुरु करावी : मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:10 PM2020-09-07T23:10:55+5:302020-09-08T01:28:56+5:30
त्र्यंबकेश्वर : परिवहन महामंडळाने बस वाहतुक सुरु केल्यामुळे दररोज नाशिकला जाणा-यांची गैरसोय दुर झाली खरी पण सकाळीच कामावर जाणा-यांची मात्र गैरसोय होत आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : परिवहन महामंडळाने बस वाहतुक सुरु केल्यामुळे दररोज नाशिकला जाणा-यांची गैरसोय दुर झाली खरी पण सकाळीच कामावर जाणा-यांची मात्र गैरसोय होत आहे.
सकाळी त्र्यंबकेश्वर परिसरातील तळेगाव (त्र्यं) काचुर्ली शिरसगाव पिंपळद (त्र्यं) आदी ठिकाणचे लोक त्र्यंबकेश्वर येथे येउन बसची वाट पाहतात. किंवा खाजगी वाहनांना विनवणी करतात. तर पेगलवाडी अंजनेरी बेझे वाढोली खंबाळे तळेगाव व महिरावणी आदी ठिकाणचे लोक सातपुर अंबड नाशिक येथे खाजगी कंपन्या शासकीय निमशासकीय ठिकाणी कामावर जाण्यासाठी वाहनांची वाट पाहत बस थांब्यावर उभे राहतात.
यासाठी सकाळी साडेसहाच्या दरम्यान त्र्यंबकेश्वर नाशिक बस सुरु करावी अशी मागणी त्र्यंबकेश्वर परिसरातुन होत आहे. पुर्वी नांदगाव शिर्डी या मुक्कामी बस अनेकांना सोयीच्या होत्या. पण अद्याप त्या सुरु न झाल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. असे ऐकले आहे की जिल्हा बंदी उठवल्याने आंतरजिल्हा बस वाहतुक सरु केली आहे पण त्र्यंबकेश्वरला मात्र दुर का ठेवले आहे. एक एक तासाने किंवा जसे प्रवासी उपलब्ध होतील तशा बस सोडण्यात येतील असे जाहीर केले असतांना बस मात्र सोडल्या जात नाहीत. गेले पाच सहा महिने लॉकडाउन मुळे लोकांना घरातच राहण्याची सक्ती केल्याने लोक एखाद दोन महिने आपल्या जवळ असलेल्या साचलेल्या पैशावर कसे तरी आपले प्रपंच चालवले. पण हातावर पोट भरणारे कसे भागवणार ? परप्रांतीय आपापल्या गावाला गेले. आता स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाले तर जाण्या येण्याची साधने नाहीत. या करिता बसच्या संख्येत वाढ करावी. पाच सहा महिन्यां पासुन बेकार अवस्थेत असलेल्या लोकांना रोजगार मिळु लागला तर परिवहन महामंडळाने बसच्या सुविधेत वेळेच्या गरजेनुसार बस उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी होउ लागली आहे. तसे निवेदन देखील नाशिक जिल्हा वाहतुक नियंत्रकांना देण्यात येणार आहे.