त्र्यंबकच्या सुरक्षारक्षकास जवानाकडून मारहाण

By admin | Published: November 6, 2016 11:24 PM2016-11-06T23:24:45+5:302016-11-06T23:27:00+5:30

दर्शनावरून वाद : परस्परविरोधी तक्रारी

Trimbak protector beaten by a stranger | त्र्यंबकच्या सुरक्षारक्षकास जवानाकडून मारहाण

त्र्यंबकच्या सुरक्षारक्षकास जवानाकडून मारहाण

Next

त्र्यंबकेश्वर : सैन्य दलातील जवान असून, ओळखपत्र दाखवूनही मंदिरात दर्शनासाठी सोडत नसल्याचा राग आल्याने जवान सुनीलकुमार नेमिचंद आनू (२८), रा. सिकर (राजस्थान) याने हातात असलेले हेल्मेट सुरक्षारक्षकाच्या डोक्यात मारून दुखापत केली. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सध्या उत्तर महादरवाजाने प्रवेश दिला जात असून , गर्दीमुळे दर्शन रांग थेट आंबेडकर चौकात जात आहे. अशा परिस्थितीत जवान आनू आपले वडील व आई यांच्यासह मला आत सोडा अशी विनंती करीत होता. तर रांगेतील अन्य लोक आरडाओरडा करतील म्हणून सुरक्षारक्षक आत सोडीत नव्हते. यात हुज्जत झाली. बाचाबाचीचे रुपांतर वादात झाले. यावेळी योगेश हा सुरक्षारक्षक आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीला धावला आणि तो भांडण सोडवित असता वरील प्रकार घडला. त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात योगेशवर प्राथमिक उपचार करून त्यास अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. तत्पूर्वी त्याने व इतर सुरक्षारक्षकांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदविली आहे.
आपणास व वृद्ध आई-वडिलास देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी मारहाण केली असून, उजव्या हातास दुखापत झाली असल्याची क्रॉस फिर्याद सुनीलकुमार या जवानाने त्र्यंबक पोलीस ठाण्यात केली आहे.
त्र्यंबकच्या पोलिस ठाण्यात हा वाद सुरू असतानाच एक मारुती व्हॅन पोलीस ठाण्याच्या आत वेगातच येऊन थांबली. आतील स्त्री-पुरुषांचा ताफा तावातावाने पोलीस ठाण्यात येऊन एकच गोंधळ केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी त्यांना शांत केले. त्र्यंबक पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Trimbak protector beaten by a stranger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.