त्र्यंबकची पाणीटंचाई दूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:25 PM2019-12-12T18:25:20+5:302019-12-12T18:27:09+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा, जि. प. उपविभागामार्फत तथा राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुमारे साडेसहा कोटी रु पयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. या कामांपैकी खैराईपाली मुळवड रायते व अंजनेरीच्या दोन वाड्यांच्या कामांना कार्यादेश प्राप्त झाला आहे.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा, जि. प. उपविभागामार्फत तथा राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुमारे साडेसहा कोटी रु पयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. या कामांपैकी खैराईपाली मुळवड रायते व अंजनेरीच्या दोन वाड्यांच्या कामांना कार्यादेश प्राप्त झाला आहे.
हट्टीपाडा (बेरवळ) शिंदपाडा व मुळेगाव या गावांचे कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास सादर केले आहेत. तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी मुरंबी व अंबोली असे दोन कामे पाठविण्यात आले आहेत. तर पिंप्री येथील एक काम तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाऊस पडूनही विविध गावे वाड्या-पाडे यांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी दरवर्षी टंचाई नियोजन व टंचाईसाठी होणाऱ्या खर्चासाठी टंचाई आराखडा साधारण आॅक्टोबरमध्ये तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतो. जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिल्यावरच टंचाईवर खर्च करण्यात येतो. सन २०२०-२१ साठी तयार करण्यात आलेला आराखडा जिल्हाधिकारी,
नाशिक यांनी मंजूर करून पाठविला आहे.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्याची पावसाची सरासरी २२५० मि.मी. आहे, पण यावर्षी सरासरीच्या चौपट पाऊस पडला. तथापि साठवण क्षमतेअभावी पडलेला पाऊस तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे पाण्याच्या स्वरूपात डोंगर उतारावरून वाहून जाते.
तालुक्यात गौतमी गोदावरी प्रकल्पाव्यतिरिक्त एकही मोठा प्रकल्प नाही. गौतमी गोदावरी प्रकल्पाद्वारे नाशिक मनपा व मराठवाड्याला पाणी पुरवितो.
सिंचनासाठी फायदा
फक्त त्र्यंबकेश्वरला येणाºया यात्रेकरु ंच्या निमित्ताने १० टक्के पाणी मृतसाठ्यातून त्र्यंबक नगर परिषद घेत असते. गौतमी गोदावरी प्रकल्पग्रस्तांनाच थोडाफार लाभ सिंचनासाठी होत असतो. एरवी तालुक्याला या प्रकल्पाचा काहीच फायदा होत नसल्याची भावना शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे.