त्र्यंबकला थंडीचा कडाका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 07:04 PM2020-12-26T19:04:40+5:302020-12-26T19:04:40+5:30
त्र्यंबकेश्वर : थंडीचा कडाका वाढल्याने ठिकठिकाणी पेटवलेल्या शेकोट्या दिसु लागल्या आहेत. फेटलेल्या शेकोट्या पाहताच रस्त्याने चाललेल्या माणसांचे पाय आपोआप शेकोटीकडे वळल्या शिवाय राहत नाहीत.
त्र्यंबकेश्वर : थंडीचा कडाका वाढल्याने ठिकठिकाणी पेटवलेल्या शेकोट्या दिसु लागल्या आहेत. फेटलेल्या शेकोट्या पाहताच रस्त्याने चाललेल्या माणसांचे पाय आपोआप शेकोटीकडे वळल्या शिवाय राहत नाहीत.
गेल्या काही दिवसांपासुन नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या तापमानात घसरण झाली असुन दिवसाचे तापमान 22त् ते 28त् अंश डिग्री सेल्सीयस पर्यंत असते. तर रात्रीचे तापमान 8त् अंश डिग्री ते 14त् अंश डिग्री सेल्सीयस तापमान असल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे.
थंडीमुळे द्राक्षबागांची काळजी घेतली जात आहे. भुरी डावनी मणी गळणी आदी रोग येउ नये म्हणुन द्राक्ष बागा परिसरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवुन कृत्रिम उब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणी संपुर्ण द्राक्ष बागांवर जुन्या साड्या लुगडी धोतर आदींचे आच्छादन करतात. गहु हरबरा यावर सध्या तरी या भागात काही परिणाम नाही. उबदार कपड्यांना मात्र चांगली मागणी आहे.