त्र्यंबकला कीर्तन सोहळ्यातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 10:23 PM2020-03-05T22:23:36+5:302020-03-05T23:14:25+5:30
त्र्यंबकेश्वर : संत चोखोबाराया यांच्या धन्य आजी दिन... या अभंगाचे निरूपण करून बंडातात्या कराडकर यांनी तब्बल १२ दिवस चाललेल्या अखंड हरिनाम द्वादश महोत्सवाची सांगता केली. या कीर्तन सोहळ्यातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : संत चोखोबाराया यांच्या धन्य आजी दिन... या अभंगाचे निरूपण करून बंडातात्या कराडकर यांनी तब्बल १२ दिवस चाललेल्या अखंड हरिनाम द्वादश महोत्सवाची सांगता केली. या कीर्तन सोहळ्यातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्यात आले.
आतापर्यंत भारतातील ११ (महाराष्ट्रासह) ज्योतिर्लिंग स्थळांवर असे अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सव साजरे करून हा बारा दिवसांचा हरिनाम सप्ताह होता.
पारायण सोहळ्यातील आजच्या दिवसाचे जागराचे कीर्तन कराडकर यांनी श्री संत चोखोबाराया यांच्या आजि दिन धन्य सोनियाचा या अभंगावर निरूपण केले. यावेळी त्यांनी आजपर्यंत बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी साजऱ्या केलेल्या पारायण सोहळ्याचा परामर्श घेतला.
व्यसनमुक्त समाज या पारायणासाठी आलेला असून, या ठिकाणी बारा दिवसांच्या या कालावधीत कोणतेही गैरवर्तन झाले नसून पर्यावरण व स्वच्छता या बाबतीत त्यांनी उपस्थित समाजाचे कौतुक केले. यावेळी निवृत्तिनाथ संस्थानचे विश्वस्त जयवंत महाराज गोसावी, डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर, संजय धोंडगे, दत्तू चांदवडकर, प्रवीण वाघ, उमेश महाराज दशरथे, सुनील कुमठेकर, केशव महाराज मुळीक, व्यसनमुक्त युवक संघाचे राज्य अध्यक्ष शहाजी काळे उपस्थित होते.प्रत्येकाने परमार्थ साधावा कराडकर महाराज यांनी चिंतन सेवेप्रसंगी परमार्थ करताना त्यासाठी कशा पद्धतीची आचारसंहिता पालन करावी, याची बंधने त्यांनी घालून दिली व ते पालन का व कशासाठी करावे हे विशद केले. सांप्रदायिक भजन व कीर्तन हे आजच्या समाजातून थोडंसं बाजूला जाण्यासाठी काही कीर्तनकार त्या परंपरेला बाधा पोहोचेल अशा पद्धतीचे वर्तन करीत असून, हे थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व सांप्रदायातील ज्येष्ठ महाराज मंडळींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.