कोरोनाबाबत त्र्यंबकला बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 09:16 PM2020-07-18T21:16:08+5:302020-07-19T00:43:15+5:30

त्र्यंबकेश्वर : येथील तहसील कार्यालयात आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, नोडल अधिकारी डॉ. मंदाकिनी बर्वे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, जि. प. आरोग्य विभागाच्या डॉ. रेखा सोनवणे-जगताप यांच्या उपस्थितीत कोरोनाबाबत आढावा बैठक पार पडली.

Trimbakala meeting on corona | कोरोनाबाबत त्र्यंबकला बैठक

कोरोनाबाबत त्र्यंबकला बैठक

Next

त्र्यंबकेश्वर : येथील तहसील कार्यालयात आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, नोडल अधिकारी डॉ. मंदाकिनी बर्वे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, जि. प. आरोग्य विभागाच्या डॉ. रेखा सोनवणे-जगताप यांच्या उपस्थितीत कोरोनाबाबत आढावा बैठक पार पडली. येत्या आठ दिवसात त्र्यंबक नगर परिषदेला आमदार निधीतून रु ग्णवाहिका व जंतुनाशक फवारणीयंत्र देणार असल्याचे आमदार खोसकर यांनी सांगितले. बैठकीपूर्वी त्यांनी कोविड केअर सेंटरला भेट दिली. यानंतर प्रांताधिकारी तेजस चव्हाण, निवासी नायब तहसीलदार रामकिसन राठोड, उपनगराध्यक्ष माधवी भुजंग आदींशी संवाद साधला. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रु ग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्याबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी त्र्यंबकचे मुख्य अधिकारी संजय चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक पायल महाले, शहर अभियंता अभिजित इनामदार, नोडल अधिकारी हिरामण ठाकरे, अमोल दोंदे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Trimbakala meeting on corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक