त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ एकेरी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:49 PM2018-11-19T22:49:59+5:302018-11-19T22:53:43+5:30
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रोड करण्यात येत असून, प्रथम अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंतच्या मार्गाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ या मार्गाच्या अर्ध्या भागातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते़ त्यामुळे या रस्त्याचे काम होईपर्यंत त्र्यंबकनाका सिग्नल बाजूकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतुक सुरु करण्यात येत आहे़
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रोड करण्यात येत असून, प्रथम अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंतच्या मार्गाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ या मार्गाच्या अर्ध्या भागातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते़ त्यामुळे या रस्त्याचे काम होईपर्यंत त्र्यंबकनाका सिग्नल बाजूकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतुक सुरु करण्यात येत आहे़ सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तातीडने ही एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे़ त्यामुळे वाहनधारकांना त्र्यंबकनाक्यापासून अशांकस्तंभाकडे येता येणार असले तरी अशोकस्तंभाकडून त्र्यंबकनाक्याकडे मात्र जाता येणार नसल्याचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे़
वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग
* स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट रोडवर पायलट प्रोजेक्ट म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या मार्गाचे नूतनीकरण होणार असल्याने पंचवटीकडून येणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना सीबीएसकडे जायचे असल्यास त्यांनी रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - शालिमार - शिवाजीरोड - सीबीएस असे मार्गस्थ होतील़ तसेच त्र्यंबकनाका - सातपूरकडे जावयाचे असल्यास शालिमार-खडकाळी सिग्नल-जिल्हा परिषदमार्गे त्र्यंबकनाका मार्गस्थ होतील़
* गंगापूररोडकडून- रामवाडी पुलाकडून येणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना मेहेर सिग्नल-सीबीएस-त्र्यंबकनाकाकडे जायचे असल्यास त्यांनी
१़ अशोकस्तंभ - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - मेहेर सिग्नल़
२़ अशोकस्तंभ - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल-शालिमार-शिवाजीरोड-सीबीएस़
३़अशोकस्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल - शालिमार- खडकाळी सिग्नल - जिल्हा परिषद-त्र्यंबकनाका-सातपूर असे मार्गस्थ व्हावे किंवा गंगापूर नाका-कॅनडा कॉर्नर-टिळकवाडीमार्गे सीबीएस असे मार्गस्थ व्हावे़
* मुंबई नाक्याकडून पंचवटीकडे जाणाºया वाहनांनी मुंबईनाका - वडाळानाका-द्वारका-आडगाव नाका-काट्या मारुती - निर्माणी या मार्गाचा अवलंब करावा़
* सिडको व सातपूरकडून पंचवटीकडे जाणाºया वाहनांनी मायको सर्कल - जुना सीटीबी सिग्नल - एचडीएफसी सर्कल - कॅनडा कॉर्नर - जुना गंगापूर नाका - रामवाडी किंवा ड्रिम कॅसलमार्गे पंचवटीकडे मार्गस्थ व्हावे़
* स्मार्ट रोडचे काम सुरू असल्याने त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ व त्र्यंबकनाका ते किटकॅट कॉर्नर परिसरात नो हॉल्टिंग, नो पार्किंग झोन कार्यरत करण्यात आले आहेत़ या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे़ या अधिसूचनेचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे़
‘ईद ए मिलाद’ मिरवणुकीमुळे नाशिकरोडच्या वाहतूक मार्गात बदल
नाशिक : दरवर्षीप्रमाणे ‘ईद ए मिलाद’निमित्ताने नाशिकरोड परिसरातून बुधवारी (दि़२१) मिरवणूक काढण्यात येणार आहे़ या मिरवणुकी मार्गावरील मंडप उभारले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने याठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार असल्याची अधिसूचना पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रसिद्ध केली आहे़
नाशिकरोड येथील ईद ए मिलादच्या दिवशी काढण्यात येणारी मिरवणूक ही नाशिकरोड-गोसावीवाडी-सुभाष रोड- डॉ़ आंबेडकर पुतळा-शिवाजी पुतळा-बिटको चौक- महात्मा गांधी रोडने सत्कार पॉर्इंट-देवळालीगाव चौकीसमोरून विहितगाव व तेथून फिरून पुन्हा देवळाली गाव गांधी पुतळा-साने गुरुजी रोडने गाडेमळा मळा- देवळालीगाव यामार्गे काढली जाते़ त्यामुळे सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधित मिरवणूक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे़
या मार्गावरून जाणा-या व येणा-या वाहनांनी १) अनुराधा चौक ते आर्टिलरी सेंटर ते रोकडोबावाडी पुलावरून विहितगाव बागुलनगर या मार्गाचा अवलंब करावा़ २) सिन्नर बाजूकडून येणारी वाहतूक ही सिन्नरफाटा उड्डाणपुलावरून दत्तमंदिर सिग्नल चौक येथून इतरत्र जातील व नाशिककडून सिन्नरकडे जाणारी वाहतूक ही दत्तमंदिर येथून उड्डाणपुलाचा वापर करतील़ ३)देवळाल कॅम्पकडून नाशिकरोडकड जाणारी वाहतूक ही बागुलनगर विहितगाव रोकडोबावाडी पूल आर्टिलरी सेंटरने दत्तमंदिरला येऊन इतरत्र जातील़