देसरडा कुटुंबीयांकडून त्र्यंबकराजाला चांदीची पाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 08:47 PM2020-12-28T20:47:05+5:302020-12-29T00:08:15+5:30
त्र्यंबकेश्वर : औरंगाबाद येथील उद्योगपती शेखर देसरडा व त्यांच्या पत्नी सुनिता देसरडा यांनी भगवान त्र्यंबकेश्वर राजाच्या पिंडीला १८ किलो वजनाची व १२ रुपये लाख रुपये किमतीची चांदीची पाळ भेट दिली.
Next
चांदीच्या पाळेचा स्विकार विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, विश्वस्त पंकज भुतडा यांनी केला. ही पाळ पिंडीभोवतीच्या डिझाइनमध्ये तयार करण्यात आली असून, पिंडीभोवती हे एक सुरक्षारक्षक कवच असणार आहे. यापूर्वी देसरडा परिवाराने सन २०१८ मध्ये देवाच्या पूजेसाठी आवश्यक असणारी १६ किलो वजनाची चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर, अडीच किलो वजनाचा चांदीचा मुकुट, चार किलो वजनाच्या चांदीच्या पादुका भेट म्हणून देण्यात आल्या. लॉकडाऊनपूर्वी १५ किलो वजनाचा पंचमुखी चांदीचा मुखवटा याच देसरडा परिवाराने देवाला अर्पण केला.