त्र्यंबकराजाच्या रथोत्सवास परवानगी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 01:07 AM2021-11-18T01:07:21+5:302021-11-18T01:07:43+5:30
त्र्यंबकेश्वर येथे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला निघणाऱ्या भगवान त्र्यंबकराजाच्या रथोत्सवाच्या मिरवणुकीला प्रशासनाने तोंडी परवानगी नाकारल्याने देवस्थानसह भाविकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप लेखी सूचना प्राप्त झाल्या नसल्याने देवस्थान संभ्रमावस्थेत आहे.
त्र्यंबकेश्वर : येथे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला निघणाऱ्या भगवान त्र्यंबकराजाच्या रथोत्सवाच्या मिरवणुकीला प्रशासनाने तोंडी परवानगी नाकारल्याने देवस्थानसह भाविकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप लेखी सूचना प्राप्त झाल्या नसल्याने देवस्थान संभ्रमावस्थेत आहे.
दर कार्तिकी पौर्णिमेला भगवान त्र्यंबकराजांचा रथोत्सव साजरा होत असतो. यावेळी गावातून मिरवणूक काढली जात असते. त्यानुसार यंदाही रथास स्वच्छ करून व विद्युत रोषणाई करून आकर्षकरीत्या सजवत मिरवणुकीसाठी भगवान त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर सज्ज करून ठेवले आहे. पण प्रशासनाकडून सायंकाळी ताेंडी परवानगी नाकारण्यात आल्याने यावर्षी ही रथ गावात दिमाखात न मिळवता त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर उभा राहणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोविडचा एकही रुग्ण नसताना मिरवणुकीला परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून प्रशासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.