त्र्यंबकेश्वरला दिवाळी साफसफाईची लगबग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 11:35 PM2020-11-08T23:35:29+5:302020-11-09T01:14:49+5:30

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात कोरोनाचे अस्तित्व अजूनही थोड्याफार प्रमाणात असताना मास्क बांधून लोक घरांची साफसफाई, तर करत आहेच. पण फारशी वापरात नसलेली तांबा पितळेची भांडी घासून स्वच्छ करून ठेवली जात आहेत.

Trimbakeshwar almost ready for Diwali cleaning! | त्र्यंबकेश्वरला दिवाळी साफसफाईची लगबग !

त्र्यंबकेश्वरला दिवाळी साफसफाईची लगबग !

Next
ठळक मुद्देसाफसफाई रंगकाम कपडे धुणे वगैरे कामे दीपावलीच्या पूर्वार्धात वेगात सुरू

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात कोरोनाचे अस्तित्व अजूनही थोड्याफार प्रमाणात असताना मास्क बांधून लोक घरांची साफसफाई, तर करत आहेच. पण फारशी वापरात नसलेली तांबा पितळेची भांडी घासून स्वच्छ करून ठेवली जात आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने कपड्यांपासून ते घराला लावण्यात येणारा रंग, आकाश कंदील, फटाके, पणत्या, खाण्यासाठी गोडधोड, शेव, पापडी, चिवडा, चकल्या, करंजी, लाडू, अनरसे आदी खाण्याच्या वस्तुंची रेलचेल असते.
रंगरंगोटी कोणी स्वहस्ते देतात, तर कोणी पेंटर लावून आपल्या पसंतीप्रमाणे रंग खरेदी करतात. अर्थात हा विषय ज्याच्या त्याच्या ऐपतीचा असतो. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये विजयादशमी झाली की वेध लागतात ते दीपावलीचे ! विजयादशमीनंतर १५ दिवस घरांची साफसफाई करणे रंगरंगोटी करणे अंथरुण, पांघरुणाची कपडे धुणे, भांडीकुंडी घासणे सर्व काही लख्ख स्वच्छ करायचा लोकांचा कल असतो. आता ही साफसफाई रंगकाम कपडे धुणे वगैरे कामे दीपावलीच्या पूर्वार्धात वेगात सुरू आहे. ही कामे संपली की दिवाळी फराळ करण्यात महिलावर्ग आपल्या घरातील पुरुषांसह सज्ज होतात. नोव्हेंबर हा दीपावलीचा महिना असतो. यावेळी महिलावर्गांची फराळाचे पदार्थ करण्याची धामधूम असते. येत्या बुधवारी (दि.११) रोजी निज आश्विन कृ.११ रमा एकादशी, तर गुरुवारी (दि.१२) गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस शुक्रवारी (दि.१३) धनत्रयोदशी, तर शनिवारी (दि.१४) नरक चतुर्दशी असते, पण यावर्षी दोन अमावस्या असल्याने याच दिवशी लक्ष्मीपूजन आहे. व रविवारी निज आश्विन अमावस्या असल्याने केवळ अभ्यंग स्नान करायचे आहे. तथापि, हे पाचही दिवस दिवाळी साजरी करायची आहे.

Web Title: Trimbakeshwar almost ready for Diwali cleaning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.