त्र्यंबकेश्वरला गणरायाचे उल्हासात आगमन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:19 PM2020-08-22T17:19:45+5:302020-08-22T17:21:17+5:30
त्र्यंबकेश्वर : कोव्हीड-१९ च्या छायेत व तालुका प्रशासनाने शासकीय आदेशाचे उल्लंघन न करण्याचे अभिवचन गणेश मंडळे शांतता समितीच्या संयुक्त बैठकीत घेतल्याने शनिवारी (दि.२२) गणरायाचे घरोघरी व सार्वजनिक मंडळाचे फक्त पाच गणेश मंडळांचे त्र्यंबकेश्वर शहर परिसरातील चार अर्ज आॅनलाईनने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सायंकाळ पर्यंत आल्याने नेहमी पेक्षा या वर्षीयंदासार्वजनिकगणेशाची स्थापना कमी दिसुन येत आहे.
लोकमत न्युज नेटवर्क

त्र्यंबक पोलीस कार्यक्षेत्रातील १५ गावे हरसुल पोलीस कार्यक्षेत्रातील दोन तीन गावांनी गाव मिळुन एकच गणपती स्थापन केला. शहरात दरवर्षी ३० ते ३५ लहान मोठ्या मुर्ती सार्वजनिक मंडळांकडून बसवले जातात.तथापि या वर्षी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी गणेशोत्सव या वर्षी रद्द केले आहेत. तर शहरात अवघ्या चार मंडळांनी प्रशासनाच्या नियमाप्रमाणे ४ फुट गणेश मुर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
परवानगी घेतलेल्या फक्त ९ गणेश मंडळांनी सध्या शहरात पाच व कार्यक्षेत्रातील गावांमध्ये चार मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जी गणेश मंडळे न चुकता दरवर्षी गणपती बसवतात. पण त्यांच्या मुर्ती चार फुटाच्यावर थेट आठ,नऊ फुटाच्या आहेत. ही मंडळे मोठी मुर्ती विसर्जित न करता तेथेच ठेवलेली छोटीदोन फुटा पर्यंत बसवलेली लहान मुर्ती विसर्जित करतात. अशा मंडळांनी आपापल्या मोठ्या गणपतींना स्वखर्चाने स्वतंत्र शेड केलेली आहेत. अशी मंडळे आहे त्याच शेडमध्ये गणेश मुर्तीची दररोज पुजा बसवून ही मंडळे आपली परंपरा न मोडता गणेशोत्सव आहे त्या ठिकाणी साध्यापध्दतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत.
त्यामध्ये मृत्युंजय प्रतिष्ठानचा त्र्यंबकेश्वरचा राजा, लक्ष्मीनारायण चौक मित्र मंडळ, प्रचितीराज कला क्र ीडा सांस्कृतिक मित्र मंडळ, सिध्दीविनायक कला क्र ीडा सांस्कृतिक मित्र मंडळ, न्यु सिध्दी विनायक मित्र मंडळ, नवशक्ती मित्र मंडळ, नवरंग मित्र मंडळ आदी अनेक नावाजलेले गणेश मंडळे आहेत. (फोटो)