त्र्यंबकेश्वरला कडकडीत बंद

By admin | Published: June 6, 2017 02:13 AM2017-06-06T02:13:33+5:302017-06-06T02:13:43+5:30

त्र्यंबकेश्वर : शेतकरी संपाच्या आजच्या पाचव्या दिवशी शिवसेनेतर्फे महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.

Trimbakeshwar closed the strawberries | त्र्यंबकेश्वरला कडकडीत बंद

त्र्यंबकेश्वरला कडकडीत बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : शेतकरी संपाच्या आजच्या पाचव्या दिवशी शिवसेनेतर्फे महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळच्या सत्रात काही दुकानदारांनी दुकाने उघडली होती. भाजीविके्रत्यांनीही आपली दुकाने थाटली होती; मात्र शिवसेना शहर संपर्कप्रमुख भूषण अडसरे, तालुकाप्रमुख निवृत्ती लांबे, रामनाथ बोडके, सचिन लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी गावात रॅली काढून बंदचे आवाहन करून दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली.
शहरातील सर्वच व्यवहार बंद होते. मात्र सरकारी-निमसरकारी बँका, बस वाहतूक, खासगी वाहतूक सुरळीत होती. विशेष म्हणजे व्यावसायिकांनीदेखील उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी होऊन संपाला पाठिंबा दर्शविला. शिवाजी चौकात रॅलीचा समारोप झाला. येथे एक छोटेखानी सभा झाली.
त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या यात्रेकरूंची बंदमुळे गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रांगणासमोर शिवसेनेतर्फेपिण्यासाठी थंड पाणी, नास्ता, चहाची मोफत सुविधा देण्यात आल्याने यात्रेकरूंची गैरसोय टळली. आजच्या बंदमध्ये मुख्यत्वे शिवसेनेचा प्रामुख्याने सहभाग असला तरी शहरातील काही भागात पक्षभेद विसरून शेतकऱ्यांसाठी एकत्र आलेल्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते व्यावसायिकांना दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, कैलास आकुले, पोलीस हवालदार नंदू कडभाने, मेघराज पाटील आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. गावाबाहेर किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. त्यापैकी अंजनेरी शिवारात नाशिक-त्र्यंबकेश्वर बसवर दगडफेक करण्यात आली. त्यात बसच्या मागील बाजूच्या काचा फुटल्या. दुसऱ्या प्रकारात पिंपळद येथील
तरु ण अनिल पंढरीनाथ गांगुर्डे (३०, रा. पिंपळद, त्र्यंबक) हा जव्हार येथे मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी बसने जात असताना अंबोली फाट्यावर बस उभी असताना अज्ञात मुलाने बसवर दगड फेकला असता अनिल गांगुर्डे याला लागला. त्याच्या डोक्याला खोलवर जखम झाली आहे. त्याला एका तरु णाने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यास पाच टाके पडले आहेत. सध्या तो उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. या दोन घटना वगळता शेतकरी बंद यशस्वीरीत्या पार पडला.

Web Title: Trimbakeshwar closed the strawberries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.