थंडीतही त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:28 PM2020-02-01T18:28:54+5:302020-02-01T18:30:31+5:30
त्र्यंबकेश्वर : परिसर व संपुर्ण तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असुन थंडीचाही कडाका वाढला आहे. रात्री ८ ते ९ डिग्री सेल्सीयस तापमान असते.
लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : परिसर व संपुर्ण तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असुन थंडीचाही कडाका वाढला आहे. रात्री ८ ते ९ डिग्री सेल्सीयस तापमान असते. तर दिवसा उन सावल्यांच्या खेळात तापमान अवघे २५ ते २७ डिग्री सेल्सीयस असते. त्यामुळे दिवसा देखील गरम कपडे घालुन वावरावे लागते. अशा परिस्थितीत देखील शनिवार रविवार अशा विकेंडला सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटकांची येथे प्रचंड गर्दी होत आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आगळे वेगळे वैशिष्टय असलेले ज्योतिर्लिंग. दक्षिण भारताला सुजलाम सुफलाम करणारी दक्षिण गंगा गोदावरीचे उगम स्थान १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा येथेच भरतो. संपुर्ण श्रावण महिना व या महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी सिंहस्थ सदृश्य पर्वणी एवढी गर्दी होत असते. नारायण नागबली सारखे धार्मिक विधी येथेच होत असल्याने येथे नेहमीच गर्दीचा सुकाळ असतो. अशा परिस्थितीत देखील भाविकांचा सततचा राबता येथे असतो.
शहरात असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीराच्या पार्श्वभूमीवर नुकतीच २० जानेवारी रोजी संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरली होती. यात्रेच्या निमित्ताने आलेले गरम व उलनचे कपडे ब्लँकेट विक्र ेते यांचा मुक्काम अजुनही त्र्यंबकेश्वरला आहे.
दरम्यान सध्या असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बी गहु, हरबरा, मसुर, द्राक्ष आदी पिकांवर प्रतिकुल पडत आहे. हे वातावरण असेच होत राहीले तर गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर काही शेतकऱ्यांच्या गव्हावर तांबेराचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत.